Posts

Showing posts from April, 2023

पत्रास कारण की

  प्रिय मिताली मॅम,   काय काय लिहू तुमच्याबद्दल … तुम्हाला म्हटलं ना मी तुमचा हा खांद्यावरचा हात खुप आधार देतो हो..अंगात मूठभर मांस चढावं असं तुमचं प्रत्येक वाक्य असतं.. कुठून सुरु हा प्रश्न मला पडतं नाही कारण वनामतीच्या आपल्या पहिल्या भेटीच्यावेळच्याच चार गोष्टी टिपून घेतल्या होत्या डायरीत…अगदी तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या आणि समित्या बनवून अंमलबजावणीची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकून आम्हाला लीडरशीपचा पहिला पाठ पहिल्याच दिवशी शिकवला होता..वनामती आणि आमचं नातं बहरावं यासाठी तुमचे प्रयत्न आमच्या ॲाफिसचे आणि जनतेचं नातं सुधारवण्यासाठी आम्हाला नेहमी आठवतील….किती छोट्या गोष्टी लिहू…एका मेसेज कॅालवर उपलब्ध असणं असो की सर्व कर्मचार्यांना स्पेशल वाटेल असं बोलणं मग ते हाऊसकिपिॅग स्टाफला गिफ्ट द्यायचं सुचवणं असो की प्रत्येक वेळी लक्ष्मण काकांना बोलवणं असो…कौतुकाची थाप पाठीवर टाकण्यात तर तुम्ही कणभर सु्द्धा कमी पडत नाही ..मग ते गुढीपाडव्याला ,कल्चरला आमच्यासोबत सहभागी होणं असेल किंवा आज मॅगझिन उद्घाटनाला ते आमचे कष्ट म्हणत आमच्याहाती रिबीन देणं..कसं जमत हो तु्म्हाल...

उंच तिचा झोका

  महिला दिन स्पेशल   “ उंच तिचा झोका” खुप दिवसांपासून लिहायचं होतं या विषयावर … आजपेक्षा दुसरा कोणता मुहुर्त नसावा वाटतं लिहिण्याला..अनेक महिला प्रशिक्षणार्थी अधिकारिणींची हीच गोष्ट आहे ती मांडण्याचा छोटा प्रयत्न..राज्यभर जिच्या यशाचा डंका वाजतोय अशा एका अधिकारिणी मैत्रीणीचा प्रवास….. तशी ती महाराष्ट्रातल्या स्त्रींच्या आकडेवारीत बर्यापैकी मागे असलेल्या जिल्ह्यातील …दहावी बारावीपर्यंत शिकल्यानतंर तिच्या सगळ्याच मैत्रिंणीची लग्न झालीत तसं हिचेही लग्न करुन टाका असं सुरु झाला..पण आईवडिल नेटाने तग  धरुन राहिले आणि पोरीला इंजिनीअरींगला धाडली ..खरंतर त्यांचा हा निर्णय तिथल्या लोकांना क्रांतीकारी वाटत होता.. पोरीने इंजिनीअरींग पूर्ण केल्यावर तिच्या लग्नाचे वेध सगळ्यांना लागले आणि चांगल स्थळ बघून घरच्यांनी तिच्या लग्नाचा बार उडवून टाकला..पण लग्नानंतर तिच्या कर्तुत्वाला खरे पंख फुटले अगदी “जगण्याला पंख फुटले”गाण्याप्रमाणे”…लग्न करुन सुखी स्वप्न असणार्या एका गृहिणींचे रुपांतर एका दृढ निश्चयी अधिकारिणीत झालं..तशी ती अभ्यासात हुशार होती म्हणून पालकांनी इंजिनीअरिंगपर्यंत शिकू दिलं ...