तूजविण संसारी
#जागर स्त्रीशक्तीचा. आनंदीगोपाळ चित्रपटाच्या खालील ओळी तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना..!! अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता…!! तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ व्हा..!! प्रत्येक शब्दावर विचार करावा अशी ही रचना… महिलादिन ,नवरात्र आली की स्त्रीशक्तीचे गोडवे गायचे असं नाही पण या दिवसात जाणीवपूर्वक आजूबाजूच्या स्त्रीशक्तीला टिपावं…आपल्याच घरातली आई ,आजी ,ताई ,पत्नी ,मुलगी या सगळ्यांच एकाच वेळी किती आघाड्या सांभाळत असतात…जीव थकायला होतो असं बरंच काही सांभाळत असते ती ते ही न थकता ..जणूकाही तिला वरदानच लाभलं आहे अष्टभुजा होऊन संसार सावरायचं…जमेल तसं ना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नारीशक्तीशी निव्वळ बसुन गप्पा मारायच्या..मग ती शेतात राबणारी एखादी स्त्री , शाळेत शिकवणारी एखादी शिक्षिका,पतीच्या अकाली जाण्याने संसाराचा गाडी हाकलणारी कर्ती स्त्री ,जबाबदारीच्या ओझ्याखाली दबली गेलेली एखादी मोठी बहिण,करियर आणि संसार याचा बॅलन्स घालु बघणारी ...