विषयांतर
*Exclusive from Aspirant's diary*😍📝
आयुष्यातले काही प्रवास खूप खास असतात.😍...जेव्हा आपण एकदम 'स्व'सोबत असतो...एकप्रकारचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न करत असतो📝.. आयुष्यात एका पल्ल्यावरून दुसऱ्या पल्ल्याकडे झेपावताना वेड मन उगाच भूतकाळात डोकावते तर कधी भविष्याच वेध घेत असते... window सीटला बसून आवडत्या गाण्याची playlist सोबत वाऱ्याच्या मंद झुळुकेसोबत मन आयुष्यात जे जे चांगल लाभलं त्याबद्दल मनोमन कृतार्थ होत असतं... खरच विचार करा ना..काय वाटतं असेल त्या प्रवासात जेव्हा कोणी स्पर्धा परीक्षेसाठी घर सोडून मोठया शहरात जात असेल...काय वाटतं असेल त्या प्रवासात जेव्हा prelims cha चांगला score आल्यावर मेन्स ची तजवीज करतानाचा एखादा प्रवास ..अन अर्थातच काय वाटत pre mains च दिव्य पार करून just one step away म्हणत delhi च्या dholpura house कडे किंवा एमपीएससी च्या मुलाखत केंद्राकडे धावतानाचा प्रवास ..हे फक्त आपल्याच क्षेत्रात होतं असं नक्कीच नाही पण aspirant ch विश्व काही काळ स्वत:पुरत विश्व असतं😅😅.. याही पुढे जाऊन एखाद्या IAS ला LBSNAA ला जाताना अन DC ला यशदा साठी निघतना कसं न काय वाटतं असेल... यंदा कर्तव्य असणाऱ्या "त्याला" किंवा "तिला'" कांदेपोहे कार्यक्रमासाठी "त्या" weekend la घरी जाताना and त्यापुढे ही जाऊन शेवटचं bachlor traveling मनात काय काय भावनाकल्लोळ आणत असतील ...पुढे जाऊन रिमोट location la बदली झाली की जड अंतकरणाने फॅमिली ला नजरेआड करताना काय वाटतं असे अनेक प्रवास अजून सस्पेन्स आहेत....हे असे सगळे प्रवास आयुष्यात प्रचंड प्रेरनादायी असतात एवढं मात्र नक्की... जाणिवा घट्ट करणारे असे छोटेमोठे प्रवास आयुष्याचया टप्प्यावर सगळ्यांनाच मिळत असतात फक्त त्याचं मर्म ओळखता यायला लागलं की जीवनातली उत्सुकता नेहमी टिकुन राहते... जीवनाचे प्रत्येक पान उलगडायला मग रोज वेगळी मजा यायला लागते.. असो असे प्रवास सगळ्यांना सगळ्या टप्प्यावर मिळो हीच सदिच्छा..
Written while travelling for mpsc interview 10.04.2022
©PunamAhire©
#छंद जोपासताना📒🖌📄
Hello Ma'am
ReplyDeleteBeautiful blog!!
Polity part 2 che recordings pn upload Kara..plz