काय वाटतं आई तुला* ( Aspirant to officer's mother)
*
काय वाटत आई तुला
चांगल्या पगाराची नोकरी
सोडून लेकिला mpsc साठी
पुण्याला धाडताना
जगावेगळया स्वप्नाची चेन करु देताना ..
काय वाटतं आई तुला
बाकी मुली स्व पगारातून
आईला गिफ्ट देताना
तू मात्र लेकिला test series अन
Library साठी पैसे पाठवताना...
काय वाटतं आई तुला
बाकी मुलींचे company त
Promotion होताना
तू मात्र थोडक्यात pre
निसटलेलया लेकीच सांत्वन करताना..
काय वाटतं आई तुला
लेकीचं बालपण सणीसुदी आठवतांना
अन् मेसला गोडधोड खाऊन घे ग म्हणत
पदराची कड ओली करताना..
काय वाटतं आई तुला
बाकी मुलीचे biodata बनताना
तू मात्र लेकीच्या मुलाखतीची वाट बघताना..
काय वाटतं आई तुला
बाकी मुलींचे कांदेपोहे कार्यक्रम होताना
तुझी लेक मात्र mock चे उंबरे झिजवताना...
काय वाटतं आई तुला
बाकी मुली आईसोबत weekend enjoy करताना तू मात्र रविवारीसुदधा निबंधचा पेपर असतो म्हणत डब्यासाठी घाई करताना...
काय वाटतं आई तुला
बाकी मुलींचा बस्ता पाहताना..
तू मात्र मुलाखतिची formal साडी धुंडाळताना...
काय वाटत आई तुला.
लेकीच्या मैत्रिणीच्या लग्नात जाताना
मुलाखत होती ग तिची म्हणत मैत्रिणीला समजावताना...
काय वाटतं आई तुला
बाकी आई लेक माहेरी येन्यची वाट पाहताना
तू मात्र निकालच्या pdf कडे डोळे लावून बघताना....
काय वाटतं आई तुला
शेजारणीच्या लेकीच विवाहवार्तात नाव पाहताना...
काय वाटत आई तुला
तुझ्या लेकीने राज्यसेवत पद मिळवत सर्व पेपरात झळकताना...
काय वाटतं आई तुला
बाकी मुलींचा सासूरवास एकताना
तुझी लेक मात्र स्त्री सक्षमीकरणासाठी टाळ्या पटकवताना..
काय वाटत आई तुला
बाकी बाया लेकीच्या मांडवपरतणीच्या साड्या नेसून येताना अन तू मात्र शाल-बुके मधे हरखुन जाताना ...
काय वाटत आई ही जगावेगळी आई होताना..
लेकीच्या स्वप्नासाठी तिला समाजापासून protect करताना .
काय वाटत आई ही aspirant to officer ची आई होताना..
काय वाटत आई साहेबांची आई म्हणून घेत शाल श्रीफळ स्वीकारताना🔥❤️😘😍
--- पुनम सुनंदा भिला अहिरे
कक्ष अधिकारी- वर्ग ब
निवड राज्यसेवा 2020
on the occasion of my mother's birthday 02.06.2022
Its really heart touching poem
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDelete