*सर्वे सुखिन सन्तु* *सर्वे सन्तु निरामया*
*सर्वे सुखिन सन्तु*
*सर्वे सन्तु निरामया*
7 मे 2022 - स्थळ राज्यसेवा मुख्य परीक्षा केंद्र
निबंधाचा विषय आला होता importance of peace in human life....हा विषय वाचताच कालच परीक्षेच्या एक दिवस आधी "दिशा"च्या ओळखीच्या एका सरांची ज्यांची सुद्घा परीक्षा होती त्या सरांच्या आईचे परीक्षेला अवघे 12-14 तास बाकी असताना निधन झाले..ही बातमी ऐकूनच तिचा peace जरा disturb झाला होता त्याला कारण ही तसंच होत ते म्हणजे मरणभय दाखवणारा तो आजार न त्यासोबत जिवाची होणारी मानसिक तगमग काही प्रमाणात तिने पण अनुभवली होती...त्यावेळी आयुष्यात सगळ्यातला मोठं काही वाटत असेल तर तो फक्त mental peace..असाच mental peace हालवणार एक वादळ गेल्यावर्षी तिच्याभोवती दहा दिवस घोंघावत होत त्याबद्दलचा हा लेखप्रपंच
(खरतर हे जागतिक आरोग्य दिनीच लिहिणार होती पण mains मुळे लेट झाला न परीक्षेच्या आधीच्या घटनेने अन निंबधाच्या विषयाने निर्धार अजूनच पक्का झाला पण मधे निकालाच्या जल्लोषात विषय जरा मागे राहिला पण कालच्या डॉक्टर्स डेला पूर्ण करते.)
27 मार्च 2021 चा दिवस होता..
2019 राज्यसेवा अंतिम निकालात पदाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर 2020 च्या जाहिरातीत स्वतला सिध्द करायचच अस तिच ठरलेल...25 मार्चला 2020 pre ची answer की आली..ती कुठेतरी मेन्सच्या अभ्यासाकडे मोर्चा वळवू पाहत होती...त्याच दिवशी तिची आई तिच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन तिला सांगते की मागे एकदा त्या doctor mam कडे गेलो होतो बघ त्याच्याकडे जाऊया आज पुन्हा..तिने प्रश्श्नार्थक नजरेने पाहत विचारले तेव्हा आई कळाले की doctor mam सहज बोलता बोलता म्हणाल्या होत्या की Postmenopausal bleeding is not normal..अस काही असेल तर त्वरित dr कडे जायला हवे..cancer सारख्या दुर्धर आजाराची सुरुवात एक एक लहान लक्षणापासुन कुठेतरी सुरवात होत असते पण सर्वसामान्य माणूस यापासून अनभिज्ञ असतो अन महिलाबाबत तर बोलायलच नको,त्यातही ग्रामीण भागात हे menopause वगैरे प्रकार काहीच माहीत नसतात अन अनेक महिला cancer ला बळी पडून भरल्या संसारातून उठुन जातात पदरी पडते ती फक्त निराशा..तर ठरल्यप्रमाणे ती तिच्या आईला Dr कडे घेऊन गेली,त्याना विशेष वाटले की आपल्या एका वाक्याला seriuously घेऊन हे पुढच्या तपासणीसाठी आले विशेष म्हणजे आईला काहीच त्रास नव्हता तरिही dr ने सांगितल्याप्रमाणे sonography test करून घेतली .sonography वाल्या dr ने report च तिला आणि तिच्या घरच्यांना न कळवता gynecologist mamलाच कळवले..त्याना uterus thicken वाटत होता अन abnormal cell growth दिसत होती..CTScan or pap smear टेस्ट करायला सांगीतले ..सकाळी निवांत mode मध्ये आलेलो ती आता tension mode मधे जायला लागली...खरंतर आईला काहीच त्रास नव्हता ..तुम्ही नसता दवाखाना पाठीमागे लावुन घेतोय अस सांगणारे सांगत होते पण आता मनात शंका आलीच तर काही रिस्क नको म्हणून ती अन तिचे कुटुंबिय पूढे जात राहीले..2-3 dr चे सल्ले घेतले , प्रत्येकाचे वेगळे मत..पण विषाची परीक्षा कुठल्याच परिस्थितीत नको म्हणत बिकट वाट ती निवडत राहिली..तसं पाहिलं तर आजाराला घाबरणार तिच कुटुंब कधीच नव्ह्तं..तिचे वडील तर सर्व नातेवाईकांचा दवाखाना पाहायचे पण ह्यावेळी ते घरी राहन प्रेफर करायचे...तिला पूढे करायचे..मोठं धैर्य एकवटून दिशा सर्व handle करत होती..घरच्यांपुढे normal वागत होती पण अभ्यासाच्या खोलीत जाऊन net वरती सगळ वाचुन आतुन खचत होती....विचार कुठच्या कुठे जायचे..पुस्तकात अश्रु ओघळत...CT scan चा report घेऊन घरातले तिच्या अभ्यासाच्या खोलीतच शिरले त्यात होत histopathological study of abnormal cell is necessary to detect whether is it Ca Cancer..हे वाचुन तर प्रचंड धडधड वाढली ..एक एक पाऊल त्या भयावह आजराकडे पडतय की काय अशीच भिती मनात वाटत होती अन mental peace तर कधीच हिरावला गेला होता...मनात नुसती आंदोलन अन विचारचक्र...histopathology साठी biopsy test करावी लागते... biopsy हा शब्दच cancer साठी बनला आहे एवढं तर सगळयाना माहीत असते ते तिलाही ठाऊक होत...काय कराव काहीच सुचतं नव्हते पण ह्या आजाराला जितका उशिर तितके complications जास्त असं म्हणत मनाचा हिय्या करत ती आईसोबत biopsy ला गेली..biopsy मध्ये doubtful cell चा detail अभ्यास केला जातो..आईला biopsy ला आत घेतलं तस तिच्या वडलाचा बांध फुटला..पहाडासारखा वाटणारा तिचा बाप धाय मोकलुण रडत होता..खरतर हिला बिचारीला रडायलाच कुणी संधी देत नव्ह्तं ..बापाची ही अवस्था पाहुन तिने मनोमन ठरवलं की काहीही report येवो आपण खचायच नाही..लढायच..biopsy झाली ,gynecologist round ला आल्या,माणसाची वेडी आशा असते दिशाने त्या mam ला विचारले की तूम्हाला काही doubtful वाटतय का? त्यावर त्या म्हणाल्या "हे बघ तस आताच काही सांगू नाही शकत पण मला संशयास्पद वाटतय थोडं पण एक आहे की तुम्ही एकदम वेळेत आला आहे जरी काही असेल तरी अगदी वेळेत उपाय सुरू होतील." Dr च्या 1st वाक्याच टेंशन घ्यायचं की 2nd वाक्याचा रिलिफ हेच तिला समजत नव्ह्तं..biopsy करून discharge दिला..Report यायला 5 दिवस लागणार होते ,ते 5 दिवस 5 वर्षांसारखे भासत होते..ते 5 दिवस report positive आला तर काय अन negative आला तर अशी घालमेल मनाची चालू होती...शेवटी तो फोन वाजला लॅब वाल्यांनी सांगितला , तुमचा report आला आहे घेऊन जा, .मनात एवढं ओझ झालं होत..तो रिपोर्ट कधी हाती घेईल आणि त्यातलं diagnosis आयुष्याची पुढची सगळी वर्ष ठरवेल की काय एवढे पुढे तिचे विचार गेले होते. सगळया देवांचे आशीर्वाद घेऊन ती तिच्या जिवलग मैत्रीण तनुजा ला घेऊन लॅब कडे धावली.. आयुष्यात कोणत्याच निकालाबाबत इतकं गळ्यापर्यंत कधी काही आल नव्हत..ती आणि तनुजा हे धापा टाकत लॅब मधे पोहचले ..कधी तो report decode करेल अस तिला झालं होत .तनुजा ने बाकी formality पूर्ण करून रिपोर्ट ताब्यात घेतला...रिपोर्ट बाहेर काढत नेट ऑन करत रिपोर्ट चा अभ्यास करायला सज्ज झाल्या जश्या ..रिपोर्ट मधल final diagnosis जेव्हा गुगलवर टाकलं तेव्हा जेव्हा आल की it's non cancerous तेव्हा थोडासा दिलासा वाटला..worst साठी prepare करून आली होती तर हे जरा बरं दिसतंय अस म्हणत अवसान सांभाळत त्या दोघी रिपोर्ट दाखवायला gynecologist कडे गेल्या...तोवर तनुजाने तिच्या मावसभावाला तो report दाखवत विचारणा केली होती..दिशा आत लाईन मध्ये नंबर लावून थांबली होती. तनुजा ने तिला बाहेरून मेसेज करून डॉक्टर दादा तर म्हंटला की घाबरण्यासारख काही नाही म्हणून ..तिचा मेसेज अजून हायास वाटलं...तेवढ्यात नर्सने तिला आत पाठवलं , डॉक्टर चे पुढचे शब्द ऐकण्यासाठी तिने कानात प्राण आणला,,..२ मिनिट रिपोर्ट शांततेत वाचून मॅम ने तिच्याकडे पाहिलं,"खरतर देवाच्या कृपेने आपल्याला ज्याची भीती वाटत होती तस काहीच नाही ,मला सुद्धा symptoms वरून शंका आली होती पण हया report मुळे सगळं clear झालं आहे, nothing to worry"... बापरे केवढा मोठ्ठा रिलीफ होता त्या शब्दात.. दिशाचा गेल्या १५ दिवसांचा टांगनीला लागलेला जीव अगदी भांड्यात पडला...आयुष्याची खुप मोठी लढाई जिंकली आहे असच जणू काही तिला वाटतं होते... hospital मधून विजयी एक्झीट घेत तिने तनुजाला डॉक्टर मॅम काय म्हंटल्या ते सांगितले आणि घरच्यांना फोन करून निश्चिंत करून त्या घरी निघाल्या .. दिशा सहज तनुजा ला म्हणाली की, "बघ येताना आपली कशी अवस्था होती आणि जाताना बघ कशी .. आपल्याकडे असणार्या २ पर्यातातूनच सगळे समदुखी जात असणार सगळे जात असणार..एकतर भयावह आजारातून सुटनार किंवा त्या चक्रव्यूहात अडकनार .. आपण सुटलो पण मॅम म्हटल्या," देवाच्या कृपेने"... का बर देवाने प्रत्येक पाऊल त्या आजाराकडे टाकत असताना ऐनवेळी निकाल बदलत आपल्या बाजूने टाकला असावा? मग अचानक तिला दृष्टांत झाला की तिने गेल्या ८-१० दिवसात ढीगभर देवांना केलेला सगळ्यात innovative नवस बहुधा देवाला पण आवडला असावा कारण तो फक्त समस्या तिच्या पुरती सोडवत नव्हता तर अजून काही चांगला वारसा निर्माण करत होता , तर तो नवस असा होता की कॅन्सर बाबत जमेल त्या माध्यमातून लोकांना aware करेल, cancer ग्रस्त कुटुंबीयांचा दुःख जाणून त्यांना moral support देईल आणि सगळ्यात महत्वाचं स्वकमाईतून ५ वर्ष तरी गरीब घरातील ३ महिलांची pap smear test करायला आर्थिक मदत करेल , सधन घरातील लोकांना त्यांच्या पैशातून pap smear करायला aware करेल आणि कदाचित त्या भयावह आजारातून जाणाऱ्यांच्या दुःखाची जाणीव आपल्याला व्हावी, त्यांची संवेदना आणि आंदोलनचा ठाव आपल्याला घेता यावा यासाठी तर नाही ना आपल्याला हा ट्रेलर मिळाला..पुढे तिने विचार केला, आज तिची आर्थिक परिस्थिती चांगली म्हणून ती त्या महागड्या उपचारांची चैन करू शकली,शहरात राहत असल्याने रोज हॉस्पिटल च्या वाऱ्या करून लवकर निदान करू शकली पण तेच गोर गरीब जनतेच काय??? menopause काय आणि कॅन्सर ची सुरुवात काय हे काहीच न समजणाऱ्या पण शेतात राब राब राबणाऱ्या कष्टकरी महीलेच काय आणि bpl च्या एका शिक्क्यासाठी शासकीय रुग्णालयाच्ये उंबरे झिजवणाऱ्या जनतेच काय?
हे विचार करूनच तिच्या काळजात चर्र झालं. आपल्या आईची सुटका ही तिच्यावरची नवीन जबाबदारी आहे हे तिला पुरत कळून चुकलं ज्या चक्र व्युहातून ती सुटली होती त्या चक्रव्यूहात अडकलेले अनेक जण नंतर तिला भेटले , काहींना त्यांचे जिवलग सुद्धा गमवावे लागले, वेळ आणि प्रसंग कधी सांगून येत नसतो हे कितीही खर असल तरी सतर्कता आणि जागरूकता ही वेळोवेळीच होऊच शकते हे तिला उमगल.. घरी येताना देवासमोर पेढे ठेवत आणि स्वतःही खात, देवाचे लाख लाख आभार मानत, नवीन जबाबदारी स्वीकारत, गेल्या १२-१५ दिवसांपासून मनावर घोंघावनार्या वादळाला शांत करून एका वेगळ्याच निर्धाराने ती पुन्हा अभ्यासाला बसली..
-- "ती अनामिक दिशा"
सत्यघटनेवर आधारित
©पूनम सुनंदा भिला अहिरे
कक्ष अधिकारी निवड २०२०
(आयुष्यातल्या प्रत्येक धड्यात एक आगळावेगळा अर्थ दडलेला असतो तो दरवेळी आपलाच धडा असावा असे काही गरजेचे नाही पण अर्थ मात्र वेळीच शोधला तर स्वतः सोबत दुसऱ्यांचे सुद्धा आयुष्य सुखकर करता येऊ शकते)
मॅम तुम्ही हे लिहलये हे मी प्रत्यक्ष अनुभवलये...
ReplyDeleteमाझ्या आई सोबत... हा लेख वाचत असतांना दिशाच्या ठिकाणी मला मी दिसत होतेय..