काय हरवली माय आजी तू?
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधत होतो तुला
पोळ्याच्या पुरणपोळीत
आम्ही शोधत होतो तुला
दिवाळीच्या खास उसळीत
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधत होतो तुला
उन्हाळ्याच्या वाळवनात
नातवंडांच्या आवडीच्या
मिरची पापडात आणि लोणच्यात
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधत होतो तुला
बोरपाटीच्या बंगल्यात
कसाडच्या झोपडीत
आणि सावलदर्याच्या शेडात
कुठे हरवली माय आजी तू?
आम्हीं शोधत होतो तुला
तुझ्या नव्या पंतवंडात
तु का रमलीस ग
वरच्या आप्तेष्टांत
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधले तुला
लसणाच्या मळीत
वांग्याच्या ओळीत
आणि कांद्याच्या चाळीत
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधले तुला
लेकिंशी बोलताना
सूनाना वानोळा बांधताना
आणि पोरांना सकाळचा
पहिला चहा पाजताना
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधले तुला
दिवाळीच्या गोतावळ्यात
भाच्याना ओवळताना
मना भाचा चांगला शेत
म्हणत बाजू त्यांची घेताना
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधले तुला
एक दिवसही
जिदादा न सोडताना
आता मात्र वर्षापासून
दडी मारून बसताना
कुठे हरवली माय आजी तू?
आम्ही शोधले तुला
भैय्याच्या नवी गाडीत
अम्ही शोधले तुला
तुझ्या आवडीच्या
गुलाबी साडीत
कुठे हरवली माय आजी तू?
मी शोधले तुला
मनी बहीण ते भारी
पुस्तक वाचस म्हणत
मी पुस्तक वाचताना
आणि तुझ्या हातचा
पहिला चहा तो पिताना
कुठे हरवली माय आजी तू?
मी शोधले तुला
माझ्या सत्काराच्या फोटोत
मनी बहीण ते मोठी
साहेब व्ह्यनी म्हणत
मला शाबासकी देताना.
-- तुझीच नात बालुताई
©पुनम सुनंदा भिला अहिरे©
मंत्रालय कक्ष अधिकारी.
आमच्या कुटुंबाची आधारवड असणाऱ्या माझ्या आजीच्या प्रथम पुण्य स्मरणानिम्मित विनम्र अभिवादन
Comments
Post a Comment