काय वाटत पप्पा तुम्हाला*
काय वाटतं आई तुलाच्या उदंड प्रतिसादानंतर सादर करण्यात येत आहे त्याचीच पुढील आवृत्ती::
*काय वाटत पप्पा तुम्हाला*
काय वाटतं पप्पा तुम्हाला
दुसरी पण मुलगी झाली
तेव्हा लोक ते हळहळताना,
तुम्ही मात्र दोघी मुलींना
मुलासारखे वाढवताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
स्वतःची सोयीची गावं सोडून
आमच्या शिक्षणासाठी
शहराकडे धाव घेताना ..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी मुली घरकामात रुळताना
तुम्ही मात्र माझ्याकडुन भाषणं
पाठ करून घेताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
शहराच्या मोठ्या शाळांचे
उंबरे ते झिजवताना,
खेड्यातले मार्क्स खोटे असता ही अवहेलना ऐकून निराश होताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला त्याच शाळेत गणितात १५० पैकी १५० च बक्षीस मात्र घेताना....
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी मुली strictly ७ च्या आत घरातचा नियम पाळताना..
तुम्ही मात्र ७ नंतर ही तेवढंच निवांत राहत NSS, NGO असेल तीच म्हणत प्रोत्साहन ते देताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी मुली रांगोळ्या त्या रंगवताना,
तुम्ही मात्र ही स्टोरी कर,
तो लेख लिही म्हणत
बातम्या मला मिळवून देताना..
काय वाटत पप्पा तुम्हाला.
लेकीच्या प्लेसमेंट च ऑफर लेटर येताना
हातातोंडाशी आलेला घास मी जॉईन नाही करणार म्हणत ती तो हिरावून घेताना ..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
चांगल्या पगाराची नोकरी सोडून mpsc साठी पुण्याला धाडताना
जगावेगळ्या प्रवाहाने ते वाहताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
लोक MPSC ला जुगार म्हणताना
तुम्ही मात्र जे होईल ते पाहू म्हणत
लेकीच्या पाठीशी उभे राहताना ..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी लोकांना लेकीच्या पगाराची साथ मिळताना
तुम्ही मात्र रूम लायब्ररी मेस साठी दर महिन्याला खिसा रिकामा करताना..
काय वाटत पप्पा तुम्हाला
ह्याला नोकरी लागली , त्याची निवड झाली हे ऐकत सत्कार त्यांचे करताना
पण आमच्यावर कधीही कोणते प्रेशर न आणता आणि निवांत अभ्यास करू देताना .
काय वाटत पप्पा माझ्या वयाच्या मैत्रिणीसाठी स्थळ शोधताना..
तेव्हा मात्र अलगद मला
अपवाद ठरवताना
लेकीच्या स्वप्नासाठी तिला समाजापासून प्रोटेक्ट करताना..
काय वाटत पप्पा तुम्हाला
मुलाखती पर्यंत जाऊन अपयश पदरी येताना..
शून्यातून सुरू करायचे हे माहीत असून आपण जिंकेपर्यंत लढू अस म्हणत लेकीला त्या सावरताना..
काय वाटत पप्पा तुम्हाला
बाकी वडील लेकीना सासर शोधताना..
तुम्ही मात्र लेकीच्या अभ्यासासाठी
Study flat भाड्याने शोधताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी वडील लेकीसाठी
संसार बादली घेताना
तुम्ही मात्र टेबल खुर्ची लाईट फॅन
असा अभ्यासाचा लवाजमा गोळा करताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी वडील सासरी पाठवताना
तुम्ही मात्र exam centre, interview hall च्या वाऱ्या त्या करताना...
काय वाटतं पप्पा तुम्हाला
लोक बर्थ. डे, Anniversary चे स्टेटस टाकताना
तुम्ही मात्र अनोखी सत्कार सिरीज चे स्टेटस टाकताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी लोक लेकीच्या
लग्नाची पंगत ठरवताना
तुम्ही मात्र १५-२० किलो
पेढे वाटताना.
काय वाटतं पप्पा तुम्हाला
रिझल्ट तो समजून घेताना. .
काय वाटतं पप्पा तुम्हाला
ती बातमीची कात्रण ती कापताना
आणि त्या बुकेवर सकाळ
संध्याकाळ पाणी ते मारताना.
काय वाटतं पप्पा तुम्हाला
बाकी लोक लेकीच्या सासरची
पाहणी ती करताना
तुम्ही मात्र लेकीच प्रशिक्षण
केंद्र आणि मेस पाहताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
लग्नाचे अल्बम तर सगळेच बनवता
पण सत्काराच्या फोटोचाही
अल्बम करत
जगावेगळा बाप तो होताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
तुमची लेक तुमचेच राज्य पुरस्काराचे
सत्कार रेकॉर्ड तोडताना
तुमच्याच चांगल्या कामाचं फळ लेकीच्या रुपात मिळालं म्हणत लोकांची शाबासकी ती घेताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
जगाशी असंग करून
लेकीला तिची स्वप्न जगू देताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
कधीही लेकीच्या क्षमतांवरून
तसुभर पण न हलताना..
पुस्तक पाठ होईपर्यंत वाचा
म्हणत निर्णयावर ठाम राहताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
"शिक्षकांची मुलगी" ते
"अधिकारी मॅडमचे वडील "
हे स्थित्यंतर होताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
लोक लाखांचे पॅकेज सांगताना
तुम्ही मात्र लाखात एक होणारा अधिकारी घडवताना..
काय वाटतं पप्पा तुम्हाला
शाळेतल्या मुलींना motivate करताना
घरातूनच स्त्री सक्षमिकरणासाठी उभ राहताना.
काय वाटत पप्पा तुम्हाला आजही लोक दुसरीही मुलगी झाली म्हणून दुःखी होताना...
काय वाटतं पप्पा तुम्हाला
असा जगावेगळा आकाशाएवढा
बाप होताना..
Aspirant to officer चे
फादर म्हणवून घेताना..
काय वाटतं पप्पा लेकिसोबत
सत्कार शाल श्रीफळ घेताना..
लांब बदलीची चीज केलं
म्हणत शाबासकी ती घेताना...
-- पुनम सुनंदा भिला अहिरे
कक्ष अधिकारी ,मंत्रालय
गट ब राजपत्रित अधिकारी
राज्यसेवा २०२०
Written on the occasion of my father's birthday 08.07.2022
Khup chhan lihili....खरोखर हीच reality आहे सद्याची..... खुप भारी वाटलं मनाला
ReplyDelete