Pain of Discipline Vs pain of Regret
Pain of discipline VS pain of regret असं लिहीलेलं एक पानं
जुन्या नोट्स चाळताना हाती लागलं हे पानं.. कित्येक दिवस स्टडीटेबलवर विसावलेलं एक कामाचं पानं..काही अनुभव शेअर करण्याचा मोह टाळता येतं नाही तसा हा..तर २०१९ च्या अंतिम निकालापर्यंत म्हणजेच १९ जुन २०२० पर्यंत पण माझ्यासाठी हा फक्त फिलोसॅाफी देण्याचा quote होता पण…२०१९ च्या अंतिम निकालातुन थोडक्यात बाहेर पडल्यावर दर दिवशी हे फिल केले आहे..कारण २०१९ च्या मुख्यला पुरेसा वेळ असताना योग्य मार्गदर्शनाअभावी ,स्वतःच्या काही गुन्ह्यामुळे(चुका नक्कीच नाही) जसं की एकाच वेळी ३-४ वेगवेगळ्या परीक्षा मनाप्रमाणे फोकस (?)केल्यामुळे स्वतः पोस्ट घालवली होती म्हणजेच काय शिस्त नव्हती अभ्यासात,विचारात आणि नियोजनात…मग आलं कोविड नावाचे वादळ..जणू काही वरील quote मनात ठसविण्यासाठीच..अंतिम निकाल लागला थोडक्यात निकाल गेला तेव्हाही जेवढे वाईट वाटलं नसेल तेवढे वाईट दरवेळी कोविडच्या कारणांमुळे परीक्षा पुढे गेली की वाटायची.. pain of regret हे तब्बल चारवेळा परीक्षा पुढे गेली तसं तसं जास्त सतावायचं.. मन मग मागचा हिशोब मागायचं की सांग मागच्या परीक्षेत pain of discipline ठेवली असती तर थोडक्यात निसटलेलं नक्की हाती लागलं असतं आणि परीक्षा पुढे गेल्यावर अशी रडायची वेळ नसती आली असं…pain of discipline ही नक्कीच pain of regret पेक्षा कमी painful आहे असा स्वानुभव आहे..२०२० च्या मुख्यपरीक्षेला तब्बल ८ महिने मिळाले पण pain of discipline मधे जगता आलं कारण मागचा याचि देही याचि डोळा घेतलेला अनुभव आणि समोर लावलेलं हे पानं..
हा लेखप्रपंच कशासाठी हे वेगळं सांगायची गरज नाही..
कोणताही regret ठेवायचा नसेल तर शिस्त तर लागेलच कारण विवेकानंदानी सांगितलच आहे
Take up one idea. Make that one idea your life — think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the way to success.
~~Pain of Discipline Vs Pain of Regret
Choice is yours.
©️ पुनम
पुनवेच्या शब्दशलाका
Comments
Post a Comment