Posts

Showing posts from February, 2023

जिल्हा संलग्नता पर्व

  बघता बघता जिल्हा संलग्नेतेचे दोन महिने संपले..वनामतीचे पुढील प्रशिक्षणासाठी बोलावणे आले आणि life on wheels च्या सेकंड इनिंगसाठी सज्ज होण्याची वेळ आली   होती पण ठरल्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांचा लेखाजोखा करायचा होता कारण ती एक आयुष्यभराची आठवण आणि शिकवण राहते आणि आयुष्याच्या डायरीतील एक एक पान “अर्थपूर्ण” करते…   काही महत्वाच्या अनिवार्य संलग्नता आटोपून आम्ही जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी रुजु झालो..कक्ष अधिकाऱ्यांची स्वारी भलतीच खुशीत होती कारण त्यांना स्वजिल्हा मिळाला होता..बाकी सहकारी दुसऱ्या जिल्ह्यात स्वतःची व्यवस्था लावत असताना आम्ही मात्र निवांत घरीच होतो …कलेक्टर ॲाफिसला रुजु होण्यासाठी गेलो असता पहिल्याच दिवशी रुजु अहवालात काय असायलाच पाहिजे (तारीख ,सही इ.बाबी)हे आमचे रुजु अहवाल बघत तेथील एका साहेबांनी आम्हाला समजावून सांगितले..मग पहिल्याच दिवशी पुढच्या दोन महिन्याचे वेळापत्रक बनवले अगदी अभ्यासाचं बनवतो ना तसंच.. कक्ष अधिकार्यांसाठीचे जिल्हा संलग्नता म्हणजे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामक...