जिल्हा संलग्नता पर्व
बघता बघता जिल्हा संलग्नेतेचे दोन महिने संपले..वनामतीचे पुढील प्रशिक्षणासाठी बोलावणे आले आणि life on wheels च्या सेकंड इनिंगसाठी सज्ज होण्याची वेळ आली होती पण ठरल्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांचा लेखाजोखा करायचा होता कारण ती एक आयुष्यभराची आठवण आणि शिकवण राहते आणि आयुष्याच्या डायरीतील एक एक पान “अर्थपूर्ण” करते…
काही महत्वाच्या अनिवार्य संलग्नता आटोपून आम्ही जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी रुजु झालो..कक्ष अधिकाऱ्यांची स्वारी भलतीच खुशीत होती कारण त्यांना स्वजिल्हा मिळाला होता..बाकी सहकारी दुसऱ्या जिल्ह्यात स्वतःची व्यवस्था लावत असताना आम्ही मात्र निवांत घरीच होतो …कलेक्टर ॲाफिसला रुजु होण्यासाठी गेलो असता पहिल्याच दिवशी रुजु अहवालात काय असायलाच पाहिजे (तारीख ,सही इ.बाबी)हे आमचे रुजु अहवाल बघत तेथील एका साहेबांनी आम्हाला समजावून सांगितले..मग पहिल्याच दिवशी पुढच्या दोन महिन्याचे वेळापत्रक बनवले अगदी अभ्यासाचं बनवतो ना तसंच.. कक्ष अधिकार्यांसाठीचे जिल्हा संलग्नता म्हणजे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाज समजावून घेणे.. मंत्रालयातील माणसांना ground realities समजाव्यात हाच हेतू असावा बहुधा..पहिल्या आठवड्यात कोषागार कार्यालयाची संलग्नता होती तेव्हा सगळ्यात जास्त भारी वाटलं असेल तर ते म्हणजे तेथील strong room..खरचं strong room ला strong बंदोबस्त असतो आणि खुप महत्त्वाच्या गोष्टी तिथे ठेवल्या जातात अगदी एमपीएससी ,युपीएससी पेपर्स पासुन ते मतदानपेटीपर्यंत.. शासकीय सेवेत गेल्यामुळे हा strong room पाहता आला आणि कदाचित पुढे सांभाळवाही लागेल..त्यानंतर इंटरेस्टिंग ॲटॅचमेंट होती ती म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात .. तिथे पोलीस विभागाचं कामकाजं कसं चालतं एक अंदाज आला..त्यात एक सेक्शनमधे नवरा बायकोच्या भांडणांवर तोडगा काढण्याचे काम अधिकारी वर्ग करत होता. .ते पाहून शासनाला आणि पर्यायाने अधिकारी वर्गाला काय काय कामं करावी लागतं याचा आवाका आला..भरोसा सेल ,समझोता सेल हे शब्दच किती जबाबदारीचे आहेत तसे..नगरपरिषद संलग्नतेत एक लक्षात आलं की अधिकारी आणि अधिनस्थ कर्मचारी यांच्यात चांगले coordination असले की कामाचा खरा आनंद मिळू लागतो..GSTभवन मधला एक मेसेज भलताच आवडला तो म्हणजे your passion in your work makes your job interesting.. हे सांगणार्या मॅडम स्वतः GST मधे काम करण्यात passionate होत्या अगदी.. इतिहासाच्या पुस्तकासाठी प्रसिद्ध समाधान महाजन सरही तिथे भेटले त्यांनी छंद,आवडी जोपासण्याचा सल्ला दिला…शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं जरी म्हटलं की अधिकाऱ्यांना अनेक वेळा विविध कारणांसाठी कोर्टाचे उंबरे झिजवावे लागतात आणि त्यासाठी तयार व्हावं म्हणुन तीन दिवस कोर्टाचाही फिल घेतला..समाजकल्याण ॲाफिसमधे समाज कल्याणाच्या योजना तळागाळातल्या लोकांसाठी कसं आणि काय काम करतात ते समजायला मदत झाली…या सगळ्या ॲटॅचमेंटमधे नानाविध प्रकारचे अधिकारी त्यांचे नानाविध स्वभाव वैशिष्ट्ये, कर्मचारी ,व्यवस्था ,टेबल-खुर्ची ,पदानुसार बदलणारी कार्यालयाची चमक,कागदी घोडे ,प्रोटोकल्स हे सगळं रोजचचं.. जणूअधिकारी म्हणुन यंत्रणेत नवख्यांना सामावून घेण्यासाठी हा सगळा प्रशिक्षण उहापोह…काही महत्वाच्या कार्यालयात आठवडाभरची संलग्नता असे. मनपा नाशिक येथील संलग्नतेत मनपा आयुक्त सरांना भेटलो अन् वाटलं की ,”ये फिल्ड कुछ अलग है,”प्रशासन ही म्हटलं तर चांगली सुरक्षित नोकरी,म्हटलं तर पद,प्रतिष्ठा, म्हटलं तर पॅावर आणि पैसा पण ह्या सगळ्या परिघाच्या पलीकडे जाऊन काही लोकांसाठी प्रशासन ही जीवापाड जपलेली पॅशन ही असते..आणि कदाचित अशा लोकांमुळे प्रशासनच वलय टिकून राहत… काही अधिकार्यांना भेटलं की वाटतं”पदाची उंची किती असते ते माहित नाही पण व्यक्तीच्या कार्यकर्तुत्वाची उंची अफाट असते”
बरं एवढं मोठं शिवधनुष्य पेलताना प्रशासनाच्या नव्या फळीकडे म्हणजेच नवख्या परीविक्षाधीन अधिकार्यांसाठीही विशेष वेळ काढुन गप्पा मारल्या जाता आणि त्यांच्यासोबत जेवणासाठी वेळ काढून अनुभवाचे चार शब्द सांगितले जातात तेव्हा आपल्यापाठीवर कुणाचा तरी हात आहे ही सुरक्षततेची भावना मनाला सुखावून जाते…आणि तोच जिल्हा संलग्तेचा सार वाटुन जातो….मनपाची संलग्नता अनेक अंगांनी समृद्ध करणारी वाटली ..पुढच्या काही कार्यालयांवेळी नेमकेच मुलाखतीचे पडघम वाजु लागले..त्यासाठी चांगलेच सहकार्य कार्यालयांनी केल..आपण अजुन पुढे जावे यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि शुभेच्छा कोणत्याच कार्यालयातून कमी पडल्या नाही हे खास लक्षात राहण्यासारखे..फक्त त्यांनी निकाल कळवायला मात्र आर्वजुन सांगितले…
मुलाखतीनंतर विभागीय आयुक्त कार्यालय संलग्नतेतून खुप नव नवीन बाबी कळाल्या..प्रशासकीय बाबीतर खुर्चीत बसल्यावर हळूहळू समजतील पण बाकी अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या.. जसं की एक उपायुक्त सर म्हटले की पुर्ण वेळ आपण फिल्ड पोस्टिंग घेतल्या की आपली कार्यक्षमता कमी होते त्यामुळे आलटून पालटून साईड पोस्टिंग घेऊन स्वतःला रिज्युनिवेट व्हायला वेळ द्यायचा छान..अजुन एका उपायुक्त सरांनी बदलीची करुण कहाणी सांगत घरातील चार जण चार ठिकाणी राहून मेसचे डब्बे खातो हे ऐकुन भविष्याची चिंताही वाटुन गेली क्षणभर…वयाच्या विसाव्या वर्षी डेप्युटी कलेक्टर होऊन सध्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त असणार्या एका मॅडमची भेट सर्वाथाने खास झाली..प्रशासनात गुडविल,चांगला जनसंपर्क ,प्रभावी संवादकौशल्ये खुप महत्वाची ठरतात असही सांगितले..त्याही पुढे जाऊन घर-प्रशासन कसं सांभाळायचे याचेही धडे दिले..मॅडमच्या दोन्ही मुली अगदी उत्तमरित्या प्रशासन जाणतात हे सांगताना मॅडमला एक अधिकारिणी आई म्हणुन विशेष अभिमान वाटत होता.विभागीय चौकशी कार्यालयात एक वेगळाच माहोल होता…महामंडळाच्या संलग्नतेत अगदी श्रीमंत महामंडळापासुन ते गरीब सगळे पाहता आले..एसटी महामंडळातून अनेक बाबी पाहता आल्या.. एकुणच जिल्हा संलग्नता म्हणजे प्रशासनाला जाणुन घेण्याचा भाग होता..नानाविध प्रकारच्या माणसांना भेटतां आलं..काय करायचे ,काय करायचे नाही याच थोडंफार रेखाटन मनाच्या पटलावर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आणि aspirant कडुन अधिकारी होण्याकडे हळूहळू पाऊले पडत आहेत..लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे tea कल्चर..अगदी चहा,कॅाफी ,ब्लॅक टी,ग्रीन टी,लेमन टी असे सगळेच टी प्रकार कारकुनपासुन ते आयुक्तांसोबत घेण्याचा आनंद मिळाला…स्वजिल्ह्यात असल्याने १० ते पाच नंतरचा वेळ फॅमिली ,मित्रमैत्रिणीसाठी देता यायचा..जिवलग मैत्रिणींचं सिलेक्शन सेलीब्रेशन असो की २०२१ ची मुलाखत ,२०२२ ची राज्यसेवा मु्ख्य आणि आयुष्याच्या डायरीतून चॅनेलला कंटेट देण्यापर्यंत हे सगळं या काळात मनमुराद जगता आल.. घरापासुन लांब असणार्या बाकी सहकारी वर्गाला घरी सुग्रास जेवणाला बोलावून खानदेशी मांडे खाऊ घालता आले..अशा रितीने शासकीय नोकरीत आल्यावर लगेचच स्वजिल्ह्यातील दोन महिन्यांची ही संलग्नता आयुष्याच्या डायरीत नेहमीच खास राहील….
©️©️ पुनम
प्रशासनपर्व
Written on 30.01.2023 in Nagpur-Hemalkasa journey of Maharashtra Darshan
मला २ राज्य लोकसेवा मुख्य परीक्षेचा अनुभव आहे.
ReplyDeleteनुकताच मी Complete M LAXMIKANT book ची comprehensive audio Lecture उपक्रम सुरू केला आहे
(हे fast revision lecture नाही. )
ह्या उपक्रमा मार्फत मला माझ्या बहिणीच्या खटल्यात ( जिची 2 वर्ष पूर्वी सासरच्या नी हूंडयासाठी जाळुन हत्या करण्यात आली होती.व पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी करताना निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवल्याने पूराव्या अभावी सेशनकोर्ट कडून न्याय मिळण्याची चिन्हे नसल्याने ) HIGH COURTमधे अपील करण्यासाठी पैसे जमा करायचे आहेत.
मला वाटलं असते तर मार्केट मधले so called POST HOLDERS /OFFICERS + स्वतः ला मिळालेल्या मार्काचा गवगवा करणारया आजकालच्या मुलांप्रमाणे आपला Audio course या विकून पैसे कमावले असते. पण या लोकांनी आपले नुकसान होईल या भीतीने माझ्या या कोर्स विषयी आपल्या channel वरती काही ना काही कारणे देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी नकार दिला.
ह्या व्यक्ती खरंच समाजसेवा करण्यासाठी प्रशासनात आल्या आहेत का हे देव जाणे.
पण तुमचा मोफत उपक्रमाचे कौतुक केले तेवढे कमीच आहे.
म्हणूनच तुमच्या पर्यंत आलोया.
मी हे सर्व lectures तुमच्या channel वर उपलब्ध करून देण्यास तयार आहे. मला सहानुभूती नको.
फक्त एवढीच अपेक्षा आहे की जर माझ्या या उपक्रमाचा एखाद्या व्यक्तीस फायदा झाला तर त्याने माझ्या lectures च्या लायकीप्रमाने शक्य तेवढी मदत माझ्या UPI id -9405941910@ybl वरती करावी.
Lectures आवडले तरच मदत करावी. 1₹ ही चालेल. मदत पोस्ट मिळाल्या नंतर केली तरी चालेल.
नावडल्यास मदत करू नये.
सध्या यापैकी 10 -12 lectures ची recording available आहे. उर्वरित lectures शक्य तितक्या लवकर (20 Feb ) पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
( Lectures विषयी Feedback कळवा)
Mala tumcha contact number midala nhi so commented here , I m from Bramhapuri dist Chandrapur.
DeleteMy tel id @megamechanger
Nuktach rs mains result alay .
Score 429 obc
Hoil ka ?