Posts

Showing posts from September, 2022

तशी "ती"

 स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात काही मुली अश्या दिसतात ज्यांच्यात खरचं ते टॅलेंट होते पण आज त्या समाज आणि संसारात अडकलेल्या दिसतात आणि त्यांच्यातील "अधिकारिणी"ला मी miss करते तेव्हा मला सुचलेल्या ओळी.... तशी ती होती हुशार शाळेत.. आता ती रमते तिच्या बाळात.. तशी ती जिद्दी होती माहेरी.. आता झाली ती सोशिक सासरी.. तशी ती होती जिज्ञासू अभ्यासू.. आता सासरचे म्हणता सून आमची कामसू.. तशी ती होती फिरणारी मैत्रीणीच्या ताफ्यात.. आता ती दिवसभर असते किचनच्या गराड्यात.. तशी ती होती स्वप्नाळू.. आता झालीय ती कष्टाळू.. तशी ती होती होती स्टेज गाजवणारी... आता ती झालीय नाती सांभाळत मन मारणारी.. तशी होती तिची स्वप्न मोठे ... समाजापुढे धैर्य पडले छोटे.. तशी ती होती जन्मजात अधिकारी.. आता ती आहे तिच्या घरची कामकरी.. तशी होती ती सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारी . आता झालीय ती तिला काय हवं हेच विसरणारी.. तशी ती आहे तुमच्या माझ्या घरात.. आज आहे ती आजी, आई अन ती मनात.. अशी ती दिसेल जेव्हा केव्हा... मन माझे खट्टू होते तेव्हा तेव्हा... तशी ती आजही आहे कुटुंबवादी  लेकीच्या स्वप्न स्वतःच जगणारी ती आशावादी -- पुनम ...