कृतज्ञतेचा शब्दसोहळा ्
ऋणनिर्देश ... खरंतर ऋणनिर्देश आता करावे की नाही हा एक प्रश्नच आहे कारण की हा प्रवास अजून संपला नाही. परंतु अस म्हटल जात की तात्काळ उच्चारलेले आभाराचे २ शब्द नंतर लिहिलेल्या ४पानी पत्रापेक्षा अधिक परिणामकारक असतात म्हणून हा लेखप्रपंच .. अजून बरच पुढे जायचं आहे पण प्रवासातील एक मैलाचा दगड मात्र नक्कीच साध्य झालाय.. जून २०१७ पासून सुरू झालेला एक अविरत प्रवास कुठेतरी meaningful end कडे जातोय अशी feeling आहे , कदाचित ही नव्या पर्वाची सुरुवातपण असेल . इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ८२% मार्क्स मिळवत placement नाकारत मी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला होता .ही एक informed choice n सद्सद्विवेक बुद्धीने घेतलेल निर्णय असल्याने त्याची पंचवार्षिक योजना झाली तरी माझ्या निर्णयावरती मला कधी शंका आली नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या waiting period ने माणूस म्हणून जास्त प्रगल्भ केले. या क्षेत्राची तोंड ओळख मला ज्यातून झाली ती पुस्तके धडपडणाऱ्या तरुणाईसाठी , गरुडझेप , मन में है विश्वास , हुमान Sangita Uttam Dhaigude हया पुस्तकांच्या लेखकांचे मनापासून आभार कारण की इतक्या सुंदररित...