Posts

Showing posts from May, 2022

विषयांतर

  *Exclusive from Aspirant's diary*😍📝 आयुष्यातले काही प्रवास खूप खास असतात.😍...जेव्हा आपण एकदम 'स्व'सोबत असतो...एकप्रकारचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न करत असतो📝.. आयुष्यात  एका पल्ल्यावरून दुसऱ्या पल्ल्याकडे झेपावताना वेड मन उगाच भूतकाळात डोकावते तर कधी भविष्याच वेध घेत असते... window सीटला बसून आवडत्या गाण्याची  playlist सोबत वाऱ्याच्या मंद झुळुकेसोबत मन आयुष्यात जे जे चांगल लाभलं त्याबद्दल मनोमन कृतार्थ होत असतं... खरच विचार करा ना..काय वाटतं असेल त्या प्रवासात जेव्हा कोणी स्पर्धा परीक्षेसाठी घर सोडून मोठया शहरात जात असेल...काय वाटतं असेल त्या प्रवासात जेव्हा prelims  cha  चांगला score  आल्यावर मेन्स ची तजवीज करतानाचा एखादा प्रवास ..अन अर्थातच काय वाटत pre mains च दिव्य पार करून just one step away म्हणत delhi च्या dholpura house कडे किंवा एमपीएससी च्या मुलाखत केंद्राकडे धावतानाचा प्रवास ..हे फक्त आपल्याच क्षेत्रात होतं असं नक्कीच नाही पण aspirant ch विश्व  काही काळ स्वत:पुरत विश्व असतं😅😅.. याही पुढे जाऊन एखाद्या IAS ला LBSNAA ला जाताना अन  D...

Girls aspirants जन्मा तुझी कहाणी

 Girls aspirants जन्मा तुमची कहाणी.. कधी नव्हे ते परीक्षा केंद्रावर निवांत वाटतं होतं ,त्यामुळे आजूबाजूच्या जगाचे जरा भान होते आज (बहुधा जागा जास्तच वाढल्याने असावं.) सालाबादाप्रमाणे exam hallमध्ये घुसेपर्यंत वाचायची सवय म्हणून विज्ञानाच्या micronotes घेऊन  exam centre च्या बाहेर वाचत बसलेली.. प्रसंग1- उजव्या हाताला एक चाळीशी-पन्नाशीतील एक काकू येऊन बसल्या, त्यांची मुलगी exam centre मध्ये गेलेली,सगळे candidate मध्ये जात होते पण मी काही हलेना म्हणून मला म्हटल्या," तुझी नाही का परीक्षा?" मी म्हटलं आहे ना काकू, पण मला उशीरा आत जायला आवडतं ,जेणेकरून जास्तवेळ बसावं लागतं नाही ताटकळतं, त्या म्हटल्या मी वणीहून आलीय मुलीसोबत..मला मनोमन कौतुक वाटलं  कारण एकंदरीत भाषा व राहणीमान यावरुन  शेतकरी  वाटतं होत्या अन् शेतकरी महिलांना घरातच अन् शेतात पुष्कळ काम असतात तरी त्या काकूंनी मुलीच्या परीक्षेला प्राधान्य दिलं अन् तिला परीक्षेसाठी प्रवासात सोबत अन् मानसिक आधार द्यावा म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली..आज काल WFH वाले तर सगळीकडे laptop घेऊन दिसत असताना त्या आईचं मुलींच्या परीक्...

कुठे जातात topper मुली?

 #WantToShare कुठे जातात topper मुली? काही अनुभव  ह्रदयावर कोरून ठेवायचे असतात..त्यातलाच हा एक..(थोडा त्रासदायक होता म्हणून परीक्षेनंतर लिहितेय) 21 मार्च 2021चा दिवस  होता. यथावकाश म्हणत म्हणत  एक्झाम तब्बल वर्षभर उशिरा होत होती.. High alert मध्ये पेपरला निघालेली मी.. सगळं लक्ष त्या  चार तासांवर होतं. पहिला पेपर झाला , थोडा वेगळाच होता पेपर पण पुढच्या पेपर वर भिस्त ठेवून स्वतःचे अवसान सांभाळत होती..csat च्या पेपर जाताना हळूच ती मागून अन् विचारलं , "ऐ तू दिशा आहेस ना ?" मी चरकलेच  एवढ csat alert अन् मास्क असताना कोण मला ओळखत इथवर  आलं..पाहिल तर ती पंजाबी ड्रेस घातलेली , गळ्यात मंगळसुत्र असलेली एक  मुलगी...माझी  अगदी लहानपणीची  वर्गमैत्रीण "मधू".. बालपणी म्हणजे अगदी तिसरी चौथीला एका वर्गात असू बहुधा अन् शाळेत पहिल्या दोन तीन क्रमांक राहायचो आम्ही त्यामुळे  खास ओळख..नंतर शाळा बदलल्या शहरं बदलली , तब्बल 16-17 वर्षानी तेही mpsc centre वर भेट  ...म्हणे," अगं मी तुला सकाळीच पाहिलं  पण तुझं लक्ष नव्हतं"..अगदी जुजबी बोलून  आम्...