विषय तसा महत्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा.. तर वेळ तशी संध्याकाळची साडेसात-सातची.. ठिकाण— अर्थात प्रेमाचा चहा .. चहाची वेळ तशी टळलेली त्यामुळे वर्दळ कमीच,कानात हेडफोन टाकुन आवडीची प्लेलीस्ट ट्युन करत चहाचा कप मी हाती घेतला, स्पर्धा परीक्षा करणार्याला चहा ,गाणी याबाबत एक वेगळीच ओढ असते हे काही वेगळं सांगायला नको.कानातील गाण्याचा आवाज अचानक बंद झाला कारण कॅाल येत होता पाहिलं तर श्यामलीचा फोन होता तो,तिचं नाव पाहूनच मनात काहीतरी आलं आणि तेच तिच्या फोनचं प्रयोजन होतं हेही नंतर कळालंच.श्यामली तशी माझ्या मैत्रीणीची ,प्राजक्ताची अॅाफिसमधील सहकारी ,एक-दोन वेळा भेट झाल्याने तेवढी तोंड ओळख..फोन उचलत इकडतिकडच्या गप्पा झाल्या तशी ती मुदद्दयावर आली ,” अग थोडी हेल्प हवी होती ग जरा,श्याम आहे मेन्सला ,तुला तर माहीतच आहे दरवेळीच असतो तो मेन्सला पण मेन्सच्या पुढे काही जात नाही तो आणि त्यामुळे आमच्या लग्नाची गाडीही पुढे जात नाही आहे.श्यामलीच्या बोलण्यात एक आर्जव होता. ,”अग ,प्राजक्ता आणि मी सोबतच हे अॅाफिस जॅाईन केले ,चार वर्ष झाली जॅाइन होऊन,तिचं बघ चार वर्षात लग्न वगैरे होऊन सगळंच सेट झालय...
Posts
Showing posts from November, 2022