Posts

सावित्रीबाईंस पत्र

  प्रिय साऊ… जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. तुझा जन्माने आमच्या संपूर्ण स्त्रीवर्गाचा नवा जन्म झालाय इतका खास दिवस.. खुप दिवसांपासून तुझ्याशी बोलावं वाटतयं.. अगदी शाळेत असतांना तुझ्याबद्दल भाषण करायची तिथंपासून ते एमपीएससीचा अभ्यास करतांना गाठाळ सरांच्या पुस्तकात तुला वाचतांना मन भरून यायचं तेव्हापासून.. तुझ्यामुळेच करता आलं ग ते भाषण पण आणि एमपीसएससीचा नादपण.. तु आम्हा मुलींना काय दिलं नाहीस ? सगळं दिलसं - शिक्षण नावाचं प्रभावी शस्त्र देऊन “चूल आणि मूल”च्या बाहेर जाऊन पंख पसरवण्यासाठी विस्तीर्ण आकाश दिलसं..पंख पसरवण्याची संधी तुझ्यामुळे आम्हाला मिळाली.. मला तुझं खुप कौतुक वाटतं बाई. ते यासाठी ग वयाच्या नवव्या वर्षी फुले घराण्याची सून झालीस ,काहीतरी मनात घेऊन आली असशील ना सासरी पण जगण्याला “परिस” लाभावा तसे “ज्योतिबा” लाभले..तुला स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी कोणी सज्ज केलं असेल तर ज्योतिबांनीच ना..? प्रत्येक सावित्रीला असे “ज्योतिबा”लाभले तर किती छान होईल ना ? अर्थात उलटही तितकंच खर की प्रत्येक ज्योतिबा ला “सावित्री”सारखी समर्थ साथ लाभली तर ..? कारण इतकं सोप्पं नक्कीच नव्हतं ...

Men's Day Special

अनघसाठी आजचा दिवस तसा खास होता ,त्याला आज लग्नासाठी मुलगी बघायला जायचं होतं ..घरात सकाळपासून आईची पळापळ चालली होती ,बहिणी वेगळ्या सूचना करत होत्या ,अनघ थोडा कन्फ्युझ्ड होता..एकीकडे आनंदही वाटत होता आणि एकीकडे दडपणही..शेवटी सगळ्यांची स्वारी मुलीच्या घरी गेली ..औपचारिकता झाल्यावर अनघला आणि मुलीला म्हणजेच अन्वीला दोघांना एकांतात बोलण्यासाठी घरच्यांनी वेळ दिला..दोन तीन मिनिटांची शांतता ब्रेक करुन अनघने बोलायला सुरुवात केली “तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे मला समजलं तर बरं होईल.?” हे ऐकताच अन्वयीने अपेक्षांची यादी पुढे केली ,”हे बघा आपल्या समाजात दरवेळी मुलींना गृहित धरलं जातं,दुय्यम स्थान दिलं जातं ,तसं तुम्ही समजू नये ,पितृसत्ताक समाज म्हणत दरवेळी तिच्या स्वप्नांची राखरांगोळी केली जाते तसंही काही तुम्ही करु नये ,बाकी एक मुलगी तिचं सगळं सोडून सासरी येते तेव्हा तुम्ही तिला समजून घेतलं पाहिजे वगैरे हे तर नॅार्मल आहे ते तुम्ही समजून घ्या” असं बरंच काही अन्वीने अनघने समोर मांडलं ..तो एका विचारचक्रात अडकून गेला ..काही दिवसात निर्णय कळवतो असं म्हणून अनघ आणि कुटुंबीय घरी गेले..अनघला खुप सा...

तूजविण संसारी

  #जागर स्त्रीशक्तीचा. आनंदीगोपाळ चित्रपटाच्या खालील ओळी  तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना..!! अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता…!! तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ व्हा..!! प्रत्येक शब्दावर विचार करावा अशी ही रचना… महिलादिन ,नवरात्र आली की स्त्रीशक्तीचे गोडवे गायचे असं नाही पण या दिवसात जाणीवपूर्वक आजूबाजूच्या स्त्रीशक्तीला टिपावं…आपल्याच घरातली आई ,आजी ,ताई ,पत्नी ,मुलगी या सगळ्यांच एकाच वेळी किती आघाड्या सांभाळत असतात…जीव थकायला होतो असं बरंच काही सांभाळत असते ती ते ही न थकता ..जणूकाही तिला वरदानच लाभलं आहे अष्टभुजा होऊन संसार सावरायचं…जमेल तसं ना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नारीशक्तीशी निव्वळ बसुन गप्पा मारायच्या..मग ती शेतात राबणारी एखादी स्त्री , शाळेत शिकवणारी एखादी शिक्षिका,पतीच्या अकाली जाण्याने संसाराचा गाडी हाकलणारी कर्ती स्त्री ,जबाबदारीच्या ओझ्याखाली दबली गेलेली एखादी मोठी बहिण,करियर आणि संसार याचा बॅलन्स घालु बघणारी ...

ते होते म्हणून …

#शिक्षकदिन स्पेशल.. ते होते म्हणून.. या वर्षी आजच्या दिवशी मागे वळून बघून माझ्या सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली तर मी कृतघ्न ठरेल म्हणुन ही शब्दरुपी कृतज्ञता…. शिक्षक …एक खर्या तळमळीचा आत्मा..समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्या खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते. दुसरी ते सातवी मधे लाभलेले शर्मा सर - इतकं तळमळीने शिकवायचे सर..आम्ही विद्यार्थी सरांना शाळेतही ऐकायचो आणि शाळेनंतर घरीही जायचो त्यांच्या..दिवसभर विद्यार्थ्यांमधे असणारा शिक्षक…सरांनीच पाया पक्का केला आणि...

पत्रास कारण की

  प्रिय मिताली मॅम,   काय काय लिहू तुमच्याबद्दल … तुम्हाला म्हटलं ना मी तुमचा हा खांद्यावरचा हात खुप आधार देतो हो..अंगात मूठभर मांस चढावं असं तुमचं प्रत्येक वाक्य असतं.. कुठून सुरु हा प्रश्न मला पडतं नाही कारण वनामतीच्या आपल्या पहिल्या भेटीच्यावेळच्याच चार गोष्टी टिपून घेतल्या होत्या डायरीत…अगदी तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या आणि समित्या बनवून अंमलबजावणीची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकून आम्हाला लीडरशीपचा पहिला पाठ पहिल्याच दिवशी शिकवला होता..वनामती आणि आमचं नातं बहरावं यासाठी तुमचे प्रयत्न आमच्या ॲाफिसचे आणि जनतेचं नातं सुधारवण्यासाठी आम्हाला नेहमी आठवतील….किती छोट्या गोष्टी लिहू…एका मेसेज कॅालवर उपलब्ध असणं असो की सर्व कर्मचार्यांना स्पेशल वाटेल असं बोलणं मग ते हाऊसकिपिॅग स्टाफला गिफ्ट द्यायचं सुचवणं असो की प्रत्येक वेळी लक्ष्मण काकांना बोलवणं असो…कौतुकाची थाप पाठीवर टाकण्यात तर तुम्ही कणभर सु्द्धा कमी पडत नाही ..मग ते गुढीपाडव्याला ,कल्चरला आमच्यासोबत सहभागी होणं असेल किंवा आज मॅगझिन उद्घाटनाला ते आमचे कष्ट म्हणत आमच्याहाती रिबीन देणं..कसं जमत हो तु्म्हाल...

उंच तिचा झोका

  महिला दिन स्पेशल   “ उंच तिचा झोका” खुप दिवसांपासून लिहायचं होतं या विषयावर … आजपेक्षा दुसरा कोणता मुहुर्त नसावा वाटतं लिहिण्याला..अनेक महिला प्रशिक्षणार्थी अधिकारिणींची हीच गोष्ट आहे ती मांडण्याचा छोटा प्रयत्न..राज्यभर जिच्या यशाचा डंका वाजतोय अशा एका अधिकारिणी मैत्रीणीचा प्रवास….. तशी ती महाराष्ट्रातल्या स्त्रींच्या आकडेवारीत बर्यापैकी मागे असलेल्या जिल्ह्यातील …दहावी बारावीपर्यंत शिकल्यानतंर तिच्या सगळ्याच मैत्रिंणीची लग्न झालीत तसं हिचेही लग्न करुन टाका असं सुरु झाला..पण आईवडिल नेटाने तग  धरुन राहिले आणि पोरीला इंजिनीअरींगला धाडली ..खरंतर त्यांचा हा निर्णय तिथल्या लोकांना क्रांतीकारी वाटत होता.. पोरीने इंजिनीअरींग पूर्ण केल्यावर तिच्या लग्नाचे वेध सगळ्यांना लागले आणि चांगल स्थळ बघून घरच्यांनी तिच्या लग्नाचा बार उडवून टाकला..पण लग्नानंतर तिच्या कर्तुत्वाला खरे पंख फुटले अगदी “जगण्याला पंख फुटले”गाण्याप्रमाणे”…लग्न करुन सुखी स्वप्न असणार्या एका गृहिणींचे रुपांतर एका दृढ निश्चयी अधिकारिणीत झालं..तशी ती अभ्यासात हुशार होती म्हणून पालकांनी इंजिनीअरिंगपर्यंत शिकू दिलं ...

“गोष्ट एका Mentor ची”

   खुप दिवसांपासून हा ब्लॅाग लिहायचा होता पण निकालासाठी राखुन ठेवला होता.. आपल्या आयुष्यात काही लोकांच येणं हे खर्या अर्थाने दैवी वरदान आणि ते ही पूर्वनियोजित असल्यासारखं भासतं..आपल्या मिळमिळीत जगण्याला त्यांच असणं “मिडास टच” देऊन जात ..त्यांच्यासोबत आपल्याही जगण्याचं सोनं करु पाहणारी ही माणसं..”मिडास टच” अगदी चपखल वर्णन आहे ते कसे ते पुढे समजेलच… २०१९ च्या अंतिम यादीतून बाहेर पडल्यावर समोर प्रचंड अनिश्चितता होती ,कोविडमुळे पुणे सोडलेलं,घर लहान त्यात शुन्यापासून अभ्यास सुरु करायचा अशा परिस्थितीतही पुर्ण तयारीनिेशी स्वतःला एक शेवटची संधी द्यायची होती आणि जणू या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे हा की काय देवाने _लाइटहाऊस /वाटाड्या/Mentor_ म्हणून *पद्माकर सरांना* पाठवले…. २०१९ च्या मुलाखतीच्या ग्रुपवरुन जुजबी ओळख होती ,त्यान्वये निकालानंतर अभिनंदन केलं अन् नंतर दोन-तीन माझे अभ्यासाचे काही प्रश्न विचारले सरांना तेव्हा सर म्हटले उद्या कॅाल करतो ,मी मनात विचार केला ,२०१९ च्या अॅडचे टॅाप टेनर आहेत सर त्यात डिसी ..कुठे वेळ मिळेल कॅाल करायला..पण बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी १.३०-२ ला स्टडी फ्लॅटम...