Posts

Showing posts from October, 2022

जरा विसावू ह्या वळणावर-- ट्रेनिंग डायरी

" _याच साठी केला होता अट्टाहास_"म्हणत फायनली तो दिवस उजाडला..प्रत्येक जण अनेक अडथळ्यांची मालिका पार करून ह्या वणामतीच्या उंबरठयावर मोठ्या मोठ्या बॅगा आणि मनात प्रचंड उत्साह घेऊन आला ._"वो घडी आ गई आ गई_"अस म्हणत जोधपूरी आणि पांढरया साडीमधे वनामतीमधे एकच जल्लोष सुरू झाला आणि रुजू अहवाल लिहिताच, डोक्यावर असलेली स्टेची टांगती तलवार बाजूला सारून सगळे फोटोसेशन मोड मधे गेले की अगदी आता वनामती मधून निघेपर्यंत तसांच आहे तो फोटोझोन.. ट्रेनिंगच्या पहिल्या पंधरवाड्यात सगळ्याच बाबतीत उत्साह अगदी खच्चून भरलेला होता मग तो फोटो साठी, लेक्चर मधे असो की बाहेर फिरून नागपूर explore करण असो.महाराष्ट्रतल्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या ह्या "क्रीम टॅलेंट" इतका मोठा वेळ सोबत राहणं, चहा नाश्ता,जेवणासाठी टेबलवर गप्पा मारणं, लेक्चर मधे memes चा पाऊस पाडून पुन्हा कॉलेज लाईफ जगणं म्हणजे " _एक वेगळच जग आणि वेगळीच दुनियादारी"._ .ट्रेनिंग च्या ह्या दोन महिन्यातील एक सुंदर पर्व म्हणजे "अमरावती प्रबोधिनी" .खर तर ह्या दोन महिन्यात जे काही शिकलो ते तिथेच शिकलो अस म्हणू शिक...