ते होते म्हणून …
#शिक्षकदिन स्पेशल.. ते होते म्हणून.. या वर्षी आजच्या दिवशी मागे वळून बघून माझ्या सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली तर मी कृतघ्न ठरेल म्हणुन ही शब्दरुपी कृतज्ञता…. शिक्षक …एक खर्या तळमळीचा आत्मा..समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्या खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते. दुसरी ते सातवी मधे लाभलेले शर्मा सर - इतकं तळमळीने शिकवायचे सर..आम्ही विद्यार्थी सरांना शाळेतही ऐकायचो आणि शाळेनंतर घरीही जायचो त्यांच्या..दिवसभर विद्यार्थ्यांमधे असणारा शिक्षक…सरांनीच पाया पक्का केला आणि...