कृतज्ञतेचा शब्दसोहळा ्
ऋणनिर्देश ...
खरंतर ऋणनिर्देश आता करावे की नाही हा एक प्रश्नच आहे कारण की हा प्रवास अजून संपला नाही. परंतु अस म्हटल जात की तात्काळ उच्चारलेले आभाराचे २ शब्द नंतर लिहिलेल्या ४पानी पत्रापेक्षा अधिक परिणामकारक असतात म्हणून हा लेखप्रपंच ..
अजून बरच पुढे जायचं आहे पण प्रवासातील एक मैलाचा दगड मात्र नक्कीच साध्य झालाय..
जून २०१७ पासून सुरू झालेला एक अविरत प्रवास कुठेतरी meaningful end कडे जातोय अशी feeling आहे , कदाचित ही नव्या पर्वाची सुरुवातपण असेल . इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ८२% मार्क्स मिळवत placement नाकारत मी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला होता .ही एक informed choice n सद्सद्विवेक बुद्धीने घेतलेल निर्णय असल्याने त्याची पंचवार्षिक योजना झाली तरी माझ्या निर्णयावरती मला कधी शंका आली नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या waiting period ने माणूस म्हणून जास्त प्रगल्भ केले. या क्षेत्राची तोंड ओळख मला ज्यातून झाली ती पुस्तके धडपडणाऱ्या तरुणाईसाठी , गरुडझेप , मन में है विश्वास , हुमान Sangita Uttam Dhaigude हया पुस्तकांच्या लेखकांचे मनापासून आभार कारण की इतक्या सुंदररित्या माणूस आणि अधिकारी घडवणाऱ्या क्षेत्रात मला आकर्षित केले त्याच बरोबर updowns बाबत aware केले.. तस पाहिलं तर माझा हा प्रवास दोन टप्प्यांत विभागला जातो pre covid @pune and post covid @home nashik..
पुण्यात अभ्यासासाठी जाताना Vishakha Shewale मैत्रिणीने प्रबोधिनीचा रस्ता दाखवला . ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्थेचा परीसस्पर्श ह्या प्रवासात लाभल्याने सूरुवतीपासून अभ्यासाची आनि विचारांची गाडी रुळावर राहण्यास मदत झाली .विकू सर Vivek Kulkarni आणि सविता ताईचा वरदहस्त ही आयुष्याची शिदोरी आहे.. प्रबोधिनीने अभ्यासाला पोषक वातावरण तर दिलेच सोबत खुप चांगला मित्र परिवार सूद्घा दिला.प्रबोधिनीत जोडलेल्या गेलेल्या मैत्रिणी आमची tea gang (आताचा my girls group) सोबतचा अतूट बाँड निर्माण झाला.. तिथले सुरुवातीच्या काळातील mentors Nivrutti Avhad sir IAS , Akshay Gondewar dada , Pravin Ingawale sir IPS ह्यांनी सुरुवातीला moral high ठेवला.. mpsc interview2019 वेळचा आमचा पूर्ण ग्रुप आज ऑफिसर आहे त्यातील Ajay Kokate dysp , Sayli Solanke dc , Uday Avhad ACF ,Nilesh Satpute IO ,ajikya ACST , niketan SO यांच्यासोबत मुलाखतीचा अभ्यास अगदी उत्तम झाला आणि नंतर पण खुप हेल्प केली.पुण्यातील तयारीच्या काळात मला सारथी संस्थेने मोलाचे पाठबळ दिले त्यासाठी त्यांचे खुप आभार.
सारथी संस्थेमुळे चाणक्य मंडळ परिवार मधून सुद्धा मार्गदर्शन लाभले तसेच त्यामुळे एक उत्तम अभ्यास दौरा झाला आणि चांगले frnds पण मिळाले..स्पर्धा परीक्षेचया दुसऱ्या प्रयत्नात मुलाखती पर्यंत पोहचल्याने प्रवास अगदी चांगला चालू होता आणि मग आल कोरोना नावाचं वादळ..ह्याने एमपीएससी यूपीएससी aspirant च आयुष्य संपूर्णरीत्या ढवळून काढले.त्यात भर पडली ती १९ जून 2020 चया अंतिम निकालाची ..दुसऱ्या प्रयत्नात मुलाखती पर्यंत पोहचल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या पण नायब तहसिलदार पदाने ११ मार्कने हुलकावणी दिली आणि मग पुढे उभा राहिला यक्ष प्रश्न..पुढे काय आणि कसं? कारण corona जोरात असल्याने स्पर्धा परीक्षा setup जसं की library,mess अस सगळं बंद होत आणि मी घरी आलेली होती. तेव्हा त्या निकालाच्या दिवशीच माझ्या निकालाच सांत्वन करायला आलेल्या aspirants frnds नी सोबत अभ्यास करण्याचे ठरवले.covid प्रोटोकॉल पाहता सोशल distancing चा विचार करून आम्ही(मी तृप्ती आणि अमित) आमच्या सोसयटीतील एक फ्लॅट रेंटवर घेऊन दुसऱ्या पर्वाची नव्याने सुरुवात केली.त्या फ्लॅट ला आम्ही library त रुपांतर केलं.घरी राहून अभ्यास करतांना मला २ महत्वाचे mentors,वाटाडे मिळाले ज्यांनी covid च्या अनिश्चित काळात सुदधा अभ्यासात व्यग्र रहायला शिकवल. पहिले तर Padmakar Gaikwad सर (उपजिल्हाधिकारी) , सरांनी मला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनमुळेच माझ्या तयारीला योग्य दिशा मिळाली ,एका msg वर सर उपलब्ध असायचे (सरांबद्दल एका खास ब्लॉगमध्ये नक्की लिहीन) आणि दुसरे म्हणजे mpsc विश्वातील मोठं नाव Niranjan kadam सर , सरांच्या चॅनेलवरील लिखाण आणि audio संवादाने मनाला कुठेच भरकटू दिलं नाही .,अपवाद म्हणून जगायला प्रोत्साहन दिलं.त्याबरोबरच बाकी पोस्ट holders Nikhil Khemnar sir (उपजिल्हाधीकारी ), Rohan Kuwar sir (उपजिल्हाधिकारी) यांनी सुद्धा माझ्या अभ्यासाबाबतच्या शंकाचे निरसन केले त्यासाठी त्यांचेपण खुप आभार.. Deccan IAS test series , dilip khatekar sir approch for MCQ and mahesh patil sir for English also contributed in my performance... घरी अभ्यास करताना पुणे येथील वातावरन ज्यांच्यामुळे घरीच study flat la मी create करू शकली ते study partners तृप्ती आणि अमित हे रोज ८-१० किमीचा प्रवास करून सकाळी लायब्ररीत येत त्यामुळे खुप छान अभ्यास झाला n शिस्त maintain झाली n bonding आणखीच घट्ट झाली..गेल्या ११ वर्षांपासून माझ्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचे तृप्तीचे Trupti Khairnar selection होईपर्यंत माझा हा प्रवास संपणार नाही कारण ह्या प्रवासाची सुरूवात पण तिच्यासोबत केली आहे आणि शेवटपन दोघी अधिकारी झाल्यावरच होइल. वो दिन दूर नही है😍🥳🤞 तिच्यासारखी सहप्रवासी लाभन ही माझी privilege आहे. एकमेकांना strong support केल्याने आमची नाव कधी भरकटली नाही.. फक्त तिचेच नाही तर तिच्या घरच्यांनी खुप योगदान दिले आहे..पुणे मुंबई ला परीक्षेसाठी जाणे असो की घरचे गावी गेले की टिफीन देणे असो की लंबे रेस के घोडे म्हणत motivate करणे असो सगळीकडे त्यांचा मोलाचा वाटा. Sambhaji Khairnar Nikhil Khairnar .... thank you शब्द खुप छोटा आहे अशा काही खास लोकांसाठी, .. बहिणींच्या शब्दाला प्रमाण मानणारा माझा भाऊ n study partner amit Amit Kapadnis ने पण मोलाची साथ दिली .. telegram voicechat चया माध्यमातून अभ्यास करतानाची consistent partner Rutuja Patil and all interview group members DrSnehal L Shelar Sagar Manore shubham jadhav and kale , gaurav , Akshay,padma, akshata, sonali mam,nikhil ,Akshay ,Rachana n all other friends aniruddha patil rohit kale, Shekhar Bhabad shital pawar praniti n other Jp girls and mpsc decoded channel वरती माझे free session patiently ऐकणारे बाकी aspirant friends... last but not the least सगळ्या स्वप्नांची चैन ज्यांच्या जीवावर शक्य झाली ते तीर्थरूप आईवडील Bhila Ahire Sunanda Ahire .. aspirant chya आईवडलांना समाजाच्या प्रवाहविरुद्ध वाहून मुलांना support करावं लागतं त्यात मुलीबाबत तर विचारायलाच नको ती भूमिका आईवडलानी योग्य रित्या पार पाडली,माझ्या सर्व निर्णयात माझी साथ दिली , माझी मोठी बहीण रोहिणीदिदी Rohini Ahire आणि मेहुणे रोहित दाजी Rohit Desale Patil व लहान भाऊ जीवन Jayesh Ahire यांनी मला तू अभ्यास कर म्हणत कौटुंबिक आघाड्या सांभाळल्या म्हनुन मी हे यश संपादन करू शकली. यासोबतच जीवनाच्या वाटेवर लाभलेल्या सर्व शिक्षक , मार्गदर्शक ,नातेवाईक आणि मित्रपरिवार (आप्तस्वकीय), हितचिंतक ह्या सगळ्याच्या शुभेच्छा, आशीर्वाद ह्यांमुळे हा मैलाचा दगड मी गाठू शकली.पुढील वाटचालीसाठीसुद्धा असच लक्ष असू द्या .
मनःपूर्वक आभार आणि सत्कारासाठी धन्यवाद..
पूनम सुनंदा भिला अहिरे
निवड कक्ष अधिकारी गट ब
राज्यसेवा परीक्षा निवड २०२०
Comments
Post a Comment