विषय तसा महत्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा..

तर वेळ तशी संध्याकाळची साडेसात-सातची..

ठिकाण— अर्थात प्रेमाचा चहा ..

चहाची वेळ तशी टळलेली त्यामुळे वर्दळ कमीच,कानात हेडफोन टाकुन आवडीची प्लेलीस्ट ट्युन करत चहाचा कप मी हाती घेतला, स्पर्धा परीक्षा करणार्याला चहा ,गाणी याबाबत एक वेगळीच ओढ असते हे काही वेगळं सांगायला नको.कानातील गाण्याचा आवाज अचानक बंद झाला कारण कॅाल येत होता पाहिलं तर श्यामलीचा फोन होता तो,तिचं नाव पाहूनच मनात काहीतरी आलं आणि तेच तिच्या फोनचं प्रयोजन होतं हेही नंतर कळालंच.श्यामली तशी माझ्या मैत्रीणीची ,प्राजक्ताची अॅाफिसमधील सहकारी ,एक-दोन वेळा भेट झाल्याने तेवढी तोंड ओळख..फोन उचलत इकडतिकडच्या गप्पा झाल्या तशी ती मुदद्दयावर आली ,” अग थोडी हेल्प हवी होती ग जरा,श्याम आहे मेन्सला ,तुला तर माहीतच आहे दरवेळीच असतो तो मेन्सला पण मेन्सच्या पुढे काही जात नाही तो आणि त्यामुळे आमच्या लग्नाची गाडीही पुढे जात नाही आहे.श्यामलीच्या बोलण्यात एक आर्जव होता. ,”अग ,प्राजक्ता आणि मी सोबतच हे अॅाफिस जॅाईन केले ,चार वर्ष झाली जॅाइन होऊन,तिचं बघ चार वर्षात लग्न वगैरे होऊन सगळंच सेट झालयं आणि आमचं बघ म्हणजे मी काही तुलना वगैरे नाही करत ग पण बघ ना श्यामच्या रिझल्टसाठी थांबलोय ग , सहा वर्षांची रिलेशनशिप आहे जीव थकला ग आता , मला मान्य आहे हे क्षेत्र इतकं सोपं नक्की नाही , इथे वेळ लागतो.सगळं मान्य आहे पण एवढी वर्ष झाली यार आता व्हायला हवे ना.पाणी डोक्यावरुन जातंय ,घरच्यांना अजुन किती थांबवु” तिचे  शब्द अंगावर काटे आणत होते.तिला मध्येच तोडत धीर देण्याच्या अनुषंगाने मी म्हटलं,”अगं,होईल ग आता,जागा वाढल्या आहेत बर्याच.” तिने मला त्याला अभ्यासात हेल्प कर,थोडी माझी बाजु समजावून सांग म्हणुन कॅाल केला होता .अगदी तसाच कॅाल श्यामलीने मला मागच्या मेन्सवेळीही केला होता पण तेव्हा माझचं मला होत नाही म्हणुन एवढा काही मनावर घेतलं नव्हतं पण ह्यावेळीही तिने त्याच उर्मीने,आशेने कॅाल केला होता. तिला समजावत आणि त्याच्याशी बोलायचे आश्वासन देत मी फोन ठेवणार तोच ती म्हटली,”मला एक सांग ,कोणता क्लास,बॅच,टेस्टसिरीज लावायची गरज आहे का? गरज असेल तर सांग मी लावून देते त्याला,खुप हुशार आहे तसा तो” हो कळवते म्हणतं मी फोन ठेवला आणि मन गूढ विचारात हरवलं…

श्यामलीच मनोमन कौतुक वाटलं , खरचं किती ती काळजी ,प्रेम आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे सोबत त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्याच्या स्वप्नपुर्तीसाठी तिने तीच्या लेवलला काहीतरी प्रयत्न करणं ,खरं प्रेम,मॅच्युरिटी काय असते ? हीच तर असते ..हे सगळं लिहायचं कारण हेच की निकालासोबत अनेकांचेही हेही निकाल मार्गी लागणार असतात. ही गोष्ट स्पर्धा परीक्षेतल्या अनेक श्याम आणि श्यामलींची आहे , नसतील तरी त्या पलीकडे जाऊन तुमचे आईवडीलही तुमच्या परीक्षांसाठी अनेकवेळा तुमची पाठराखण करत असतात त्यामुळे तुमच्या १००% प्रयत्नांमुळे तुमच्याच आयुष्याच्या गोष्टी पुर्णत्वास जाणार असतील तर तुमच्या इतकं पेटून उठलेले दुसरं कोणीच नसायला हवं ,पदरी निराशा नको असेल तर हाती असलेल्या संधीत तुमचं घोडं गंगेत न्हालं पाहिजे. आर्ट अॅाफ लिव्हींगच्या एका कार्यक्रमात सांगितले होते “You should not “fall “ in love, you should “Rise” in love , love may be of your friends,family and someone else.

You should be ultra Pro max positive and dedicated towards your goal when someone restlessly waiting for your result..

Disclaimer-- no prejudice while writing सत्यघटनेवर आधारित -स्थळ,वेळ,पात्र काल्पनिक..

©️पुनम

पुनवेच्या शब्दशलाका

आयुष्याच्या डायरीतून टिपुन घेताना..

Comments

Popular posts from this blog

सावित्रीबाईंस पत्र

“गोष्ट एका Mentor ची”

जरा विसावू ह्या वळणावर-- ट्रेनिंग डायरी