ते होते म्हणून …
#शिक्षकदिन स्पेशल..
ते होते म्हणून..
या वर्षी आजच्या दिवशी मागे वळून बघून माझ्या सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली तर मी कृतघ्न ठरेल म्हणुन ही शब्दरुपी कृतज्ञता….
शिक्षक …एक खर्या तळमळीचा आत्मा..समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्या खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही …
आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते.
दुसरी ते सातवी मधे लाभलेले शर्मा सर - इतकं तळमळीने शिकवायचे सर..आम्ही विद्यार्थी सरांना शाळेतही ऐकायचो आणि शाळेनंतर घरीही जायचो त्यांच्या..दिवसभर विद्यार्थ्यांमधे असणारा शिक्षक…सरांनीच पाया पक्का केला आणि अभ्यासाची गोडी लावली…दहावीत बोर्डात गणितात पैकीच्या पैकी मार्क्स पडले तेव्हा आईवडलांना सरांचीच आधी आठवण झाली ती यामुळेच …नववीत असतांना शेजवळ मॅम आल्या विज्ञान शिकवायला..mitochondria, physics, chemistry शिकवता शिकवता कित्येकवेळा आयुष्याच्या शाळेत घेऊन जायच्या..सुधा मुर्ती ,सिंधूताई सपकाळ या नावांची ओळखही मॅमने करुन दिली..तल्लीन होऊन मॅम जीवनातील मोठे आदर्श दाखवत…मन भरुन यायचं ..थोडंफार तरी अस जमावं वाटुन जायचं…अशा या शेजवळ मॅडमची बदली केली तेव्हा मॅडम आम्हाला पाहिजे शिकवायला असं म्हणत आमचं शिष्टमंडळ पर्यवेक्षक गावले सरांकडे गेलं मग सुरु झाली आमची शिष्टाई …सगळे बोलत असतांना कोण कसं बोलतयं यावर गावले सरांचं बरोबर लक्ष होतं ..कोण काय सांगताय ते ..नंतर मला थांबवुन सांगता “तू छान बोलु शकते पुनम,पण तू कधी दिसत नाही स्पर्धांमध्ये बोलतांना..सरांना कुठे माहित होत की ग्रामीण भागातून एकदम जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला आलेली मी शहरात जरा बुजरी झाली होती आणि तो न्युनगंड आणि स्वतःला अभ्यासात सिध्द करायच्या नादात मी माझे बाकीचे गुणच विसरुन गेली ते…मग सर जमेल तिथे मला पुढे करायचे..दहावीच्या पूर्वपरीक्षेचा संस्कृतचा पेपर बुडवून स्पर्धेला गावले पाठवणारे सर…बक्षीस नको,अनुभव घे ..पुस्तक वाच,बोलायला शिक यामुळे आजही कुणी कुठे बोलायला लावलं तरी पाय थरथरत नाही …अभ्यासात हुशार म्हणजे जीवनात हुशार असं बिलकुल नाही असं शिकवणारे सोनवणे सर आणि बोराडे सर…यांनीच “यश नम्रतेन शोभते” चा मंत्र दिला..पाय जमिनीवर ठेवायचं शिकवलं..बच्छाव सरांसारखा शिक्षक शुन्यातुन विश्व उभी करण्याची बळकटी द्यायचा…रविवारी दुपारी स्वप्नपु्र्तीच्या तासाला सर ज्या प्रेरणादायी गोष्टी सांगायचे त्यामुळे खुप अभ्यास करु वाटायचा…पुढे इंजीनीअरींगला आमच्यावर आईची माया करणाऱ्या जंगले मॅम असतील की NSS सारख्या प्लॅटफॅार्ममुळे “स्व” ची ओळख सोप्पी करणारे पितृतुल्य गुरुळे सर असो…या सगळ्याच्या पुढे जात स्पर्धा परीक्षेच्या महासागरात उडी घेतांना लाभलेले प्रथम शिक्षक ज्ञानप्रबोधिनीचे विवेक सर आणि सविताताई…Know yourself ,know your society and know your administrationहे सांगत career goals and life goals यांच्यातील फरक शिकवतं …कोविड काळात घरी राहून अभ्यास करत यशाचा परिस्पर्श लाभला तो द ग्रेट पद्माकर सरांच्या कॅाल ,मेसेजमधून आणि निरंजन सरांच्या लिखाणातुन ,ॲाडिओ संवादातून….तसेच खाटेकर सर , संकल्प सर ,देसले सर ,महाजन सर महेश पाटील सर, सर्व पुस्तकांचे लेखक यांनी सर्वांनी स्पर्धा परीक्षेच्या प्रवास सोप्पा केला …प्रशिक्षणकाळात वेगवेगळे शिक्षक लाभले अन् लाभताय…"आयुष्य खरचं खुप सुंदर आहे" याचा प्रत्यक्ष अनुभव मला ज्यांच्या शिकवणीतुन आला त्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनी मनापासुन धन्यवाद....काहींनी खडतर वळणावर ज्यांनी मला योग्य मार्ग दाखविला...काहींनी माझ्यातल्या मला सदैव जागं ठेवलं..काहींनी समाजाला काही देण्यात मजा आहे हे शिकविल..काही शिक्षकांनी आयुष्य जगताना "कणा" सारख नेहमी लढायला शिकविलं...काहींनी आयुष्यात साधु नाही होता आलं तरी चालेल पण संधीसाधु हो हे शिकविल..काहींच्या जगण्यातुन "ध्येयवेडे" होण्याची मजा उलगडवली...काहींनी निराशेच्या गर्तेत असताना मी मला समजुन सांगितली..जीवनाच्या वाटेवर सगळ्या वळणावर लाभलेल्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता..तुमचा वारसा पुढे नेण्यास सदैव सक्रिय .✨💯🙏
~~~ पुनवेच्या शब्दशलाका
#आयुष्याच्या डायरीतून ✨😍
#कृतज्ञतेचं पान
Comments
Post a Comment