कुठे जातात topper मुली?
#WantToShare
कुठे जातात topper मुली?
काही अनुभव ह्रदयावर कोरून ठेवायचे असतात..त्यातलाच हा एक..(थोडा त्रासदायक होता म्हणून परीक्षेनंतर लिहितेय)
21 मार्च 2021चा दिवस होता.
यथावकाश म्हणत म्हणत एक्झाम तब्बल वर्षभर उशिरा होत होती..
High alert मध्ये पेपरला निघालेली मी..
सगळं लक्ष त्या चार तासांवर होतं.
पहिला पेपर झाला , थोडा वेगळाच होता पेपर पण पुढच्या पेपर वर भिस्त ठेवून स्वतःचे अवसान सांभाळत होती..csat च्या पेपर जाताना हळूच ती मागून अन् विचारलं , "ऐ तू दिशा आहेस ना ?" मी चरकलेच एवढ csat alert अन् मास्क असताना कोण मला ओळखत इथवर आलं..पाहिल तर ती पंजाबी ड्रेस घातलेली , गळ्यात मंगळसुत्र असलेली एक मुलगी...माझी अगदी लहानपणीची वर्गमैत्रीण "मधू".. बालपणी म्हणजे अगदी तिसरी चौथीला एका वर्गात असू बहुधा अन् शाळेत पहिल्या दोन तीन क्रमांक राहायचो आम्ही त्यामुळे खास ओळख..नंतर शाळा बदलल्या शहरं बदलली , तब्बल 16-17 वर्षानी तेही mpsc centre वर भेट ...म्हणे," अगं मी तुला सकाळीच पाहिलं पण तुझं लक्ष नव्हतं"..अगदी जुजबी बोलून आम्ही परीक्षेला पळालो.............
ह्यानंतर ह्या पूर्वपरीक्षेचा निकालही लागला यथावकाश.. निकाल लागला तसा अभ्यासाचा वेग वाढला..मेन्सचे वारे वाहत होते..
मध्ये कधीतरी सोशलमिडीयावर मेसेज आलेला जरा उशीरानेच पाहिला मी...तिचाच तो मेसेज... prelims clear केलीस ना तू congrats तुला" ..मी म्हटलं आयोग नावानिशी निकाल देतेय ह्यामुळे कळालं असावं....पुढे म्हणाली,"मला जरा गाईड कर ना अभ्यासासाठी.माझं चुकतंय ग कुठेतरी"
मी म्हटलं ,"अगं नक्की "...थोडंफार बोलणं झाल त्यातून कळालं मिस्टरांच्या नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट झालो तर अभ्यासाला वेळ मिळेल ..पुढची प्रि काढायची असं तिचं conviction...तिने contact number मागितला अन् मी दिला...
साधारणतः पुढच्या आठवड्यात तिचा संध्याकाळी तिला सांगितलेल्या वेळी फोन आला..मुळात लग्न झाल्यानंतर सगळा व्याप सांभाळून अभ्यास करणार्याचे मला नेहमीच अप्रूप अन् आदर वाटतो खूप , त्यात ही तर माझी बालमैत्रीण...बराच वेळ बोललो ..अभ्यासाचे व इतरही...engg clg मध्ये topper होती ती..mpsc चा class पण केलेला..मध्यंतरी लग्न झालं तसा जरा गॅप पडला..पण आता करते ग मस्त"...contact मध्ये रहा असं म्हणतं एकमेकींना शुभेच्छा देत आम्ही फोन ठेवला...तिचा नंबर सेव्ह करत ,"यार सगळ सांभाळून अभ्यास करण्याची तयारी यांचे आधी व्हावे सिलेक्शन " मी स्वतःशी म्हणाली..
अन् आमच्या फोनला पण महिनापण झाला नसेल तोच ....."मधूची निघृण हत्या की करायला लावलेली आत्महत्या असं काही '' समजलं...मला तर अक्षरशः काहीच सुचत नव्हतं ....मी फोनमध्ये तिचा profile उघडले तर नुकताच आठ दिवसापूर्वी दसरा झालेला... तिचे प्रोफाईल open केले..पुस्तक अन् शस्र पूजन म्हणून सगळी MPSC ची पुस्तके मांडलेली...लक्ष्मीकांत सहित सगळी पुस्तकं...असं कसं काय होईल?? आपण ऐकतोय ते खरंय का..असे एक ना अनेक प्रश्न...मन तिचे मेसेज,call records पाहतं राहिल.., तो पुस्तकपूजनाचा फोटो अजूनही तसाच तेच पाहून जुन्या जाणीवा नव्याने घट्ट कराव्या वाटल्या..
कुठे जातात topper मुली तर अशा कधीतरी कुठेतरी निष्पाप बळी पडतात...
कुठे जातात त्यांची मोठी स्वप्नं तर जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातात..
ज्या मैत्रिणीला कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा अभ्यास करून त्याच कायद्याची अंमलबजावणी करायची होती तिचं त्याला बळी पडली..
दरवेळी पूर्वपरीक्षेच्या केंद्रावर माझी नजर तिला शोधेल अन् निकालाच्या pdf मध्ये सुद्धा...
"तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना " हे जपणं खूप महत्वाचे आहे..आज मधू नाही पण पुढे अशा कोणत्या मधूचा असा निष्पाप बळी तरी जावू इतकं "संवेदनशील" हे जग बनावं.. तिच अधिकारी बनायचं स्वप्न मागे राहिलेल्या अनेक दिशा एकदिवस नक्की पूर्ण करतील पण ही मधू, तिचं स्वप्न,चुरगळलेली कहानी,तिच्या आईबाबांचे केविलवाणे चेहरे अन् अधिकारी होण्याआधीच घ्यावी लागणारी एक्झीट...
मागच्या दिशांनी मात्र अधिकारी झाल्यावरही "धमण्यातल्या रुधीरास ह्या खल भेदण्याची आस अन् सामर्थ्य जगण्याचे" सदैव प्रयत्नशील राहावं यासाठी हा संवेदना प्रपंच...
(*सत्यघटनेवर आधारित.
पात्रांची नावे बदलली आहेत)
🖌Punam Ahire
👍👍
ReplyDeleteHeart wrenching...!
ReplyDeleteThe most saddest thing in the world is helplessness. Have much to write but words are not gonna make justice to her..