Girls aspirants जन्मा तुझी कहाणी
Girls aspirants जन्मा तुमची कहाणी..
कधी नव्हे ते परीक्षा केंद्रावर निवांत वाटतं होतं ,त्यामुळे आजूबाजूच्या जगाचे जरा भान होते आज (बहुधा जागा जास्तच वाढल्याने असावं.)
सालाबादाप्रमाणे exam hallमध्ये घुसेपर्यंत वाचायची सवय म्हणून विज्ञानाच्या micronotes घेऊन exam centre च्या बाहेर वाचत बसलेली..
प्रसंग1- उजव्या हाताला एक चाळीशी-पन्नाशीतील एक काकू येऊन बसल्या, त्यांची मुलगी exam centre मध्ये गेलेली,सगळे candidate मध्ये जात होते पण मी काही हलेना म्हणून मला म्हटल्या," तुझी नाही का परीक्षा?" मी म्हटलं आहे ना काकू, पण मला उशीरा आत जायला आवडतं ,जेणेकरून जास्तवेळ बसावं लागतं नाही ताटकळतं, त्या म्हटल्या मी वणीहून आलीय मुलीसोबत..मला मनोमन कौतुक वाटलं कारण एकंदरीत भाषा व राहणीमान यावरुन शेतकरी वाटतं होत्या अन् शेतकरी महिलांना घरातच अन् शेतात पुष्कळ काम असतात तरी त्या काकूंनी मुलीच्या परीक्षेला प्राधान्य दिलं अन् तिला परीक्षेसाठी प्रवासात सोबत अन् मानसिक आधार द्यावा म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली..आज काल WFH वाले तर सगळीकडे laptop घेऊन दिसत असताना त्या आईचं मुलींच्या परीक्षेला प्राधान्य देणं मनाला खुप भावून गेलं...
प्रसंग2- डाव्या हाताला एक पंचवीशीतील विवाहित मुलगी तिच्या 2-3 वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याशेजारी विसावली , तिचे मिस्टर परीक्षेसाठी आलेले..ते त्यांच्या दोन तीन वर्षाच्या मुलाला दरडावून सांगत होते ,"दादा मम्मी ला त्रास देऊ नको हा"..असं म्हणत माझ्या शेजारच्या काकूंना त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगून ते परीक्षेला गेले..मी आपली science वाचतेय...ती मुलगी मला विचारते," दिदी तुम्ही कधीपासून अभ्यास करताय"..असा प्रश्न विचारला कुणी तर इतकं चरर्र होतं आता काय सांगू😅..मग म्हणे ह्या परीक्षेसाठी graduation पुर्ण लागतं ना..म्हटलं हो , म्हणे मी चौदावीला आहे...चौदावी म्हणजे SYBA ला असताना दोन तीन वर्षांचा मुलगा मग लग्न अगदी लहान वयात झालं असणार माझा अंदाज...एकूण अंगकाठीवरून तसं वाटतं होतं..मला म्हणे," तात्यांचा ठोकळा माहीत आहे का? मनात म्हटलं ,माहीत आहे पण वाचला नाही कधी म्हणूनच की काय आपण अजून पास होत नाही की काय..म्हणे मी 2-3 महिन्यापासून वाचतेय पण शंभर पानं पण नाही झाली अजून..ह्या बोलण्यात एक त्रागा होता..म्हटलं लग्नानंतर अवघड असतं सगळं सांभाळून अभ्यास करणं..होईल जमेल हळूहळू...शेजारच्या काकू म्हणता ,"माझ्या मोठी मुलीच पाच-सहा महिने झालं - लग्न झाले , ती सकाळी दहा वाजेपर्यत सगळं आवरून घेते अन् अभ्यासाला बसते ते पण शहरवजा गावात...काकू पुढे म्हणता,"जे करायचं ते लग्नाआधीच करायचं बाई असं अभ्यास वगैरे (प्रचंड प्रेरणा होती ह्या वाक्यात)..म्हणे तसं माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाला जरा घाईच झालीये पण आता लहान मुलींच लग्न लवकर करणारच नाही मी" ..काकूंच्या बोलण्यात जो निर्धार होता तो प्रचंड सुखदायी होता..म्हणजे लग्न करुन स्पर्धापरीक्षा होऊ शकत नाही असा माझा दावा बिलकूलच नाही...पण पदवीनंतर mpsc चा अभ्यास सुरू केलेल्या कित्येक मुलींच्या अभ्यासाला एक दोन वर्षांत "लग्न "या विषयाने दीर्घकाळ मोडते (कधीकधी कायमस्वरूपी)घातले आहे...कित्येक मुलींना libraryत बसून "लग्न" विषयाच्या टांगत्या तलवारीला बळी पडताना पाहिलं आहे..मान्य आहे शंभरातील एखाद-दुसरी ते स्वप्न लग्नानंतरपण पूर्ण करतेच पण बाकीच्या नव्याण्णव जणींच काय? त्यांना आपण एकविसाव्या शतकात स्वतःहून "चूल अन् मुलं "च्या trap मध्ये ढकलत असतो. का असं होतं नाही जितके निवांत आईवडील मुलांच्या लग्नाबाबत असतात तेवढे मुलींबाबत का नसतात? काय फरक पडतो जसं मुलाचं लग्न एखाद दुसरं वर्ष उशीरा करतो तसं मुलीचं केल तर..मुलींना असं एक एक वर्ष मिळणं म्हणजे एक एक नवी स्त्री सबलीकरणाची पिढी घडवण्यासारखं होईलचं..म्हणूनच बहुधा सरकारने मुलीचं लग्नाच वय वाढवण्याचच मनावर घेतलं असावं...पुन्हा प्रश्न तिथेच येतो जेथून तो सुरु होतो तो म्हणजे समाज ..त्या समाजात मुलीच्या परीक्षेला प्राधान्य देण्यार्या काकू असून काही होणार नाही तर त्यांच्या विचारांना मूर्त रूप देणारे अजून भरभक्कम स्तंभही लागतील...काकू मला भानावर आणत म्हटल्या ," अगं जा की आता मध्ये,सगळे गेलेत...अभ्यास सोडून न देता तात्यांच्या ठोकळ्याला चिटकलेल्या तरीपण मातृत्व,पत्नीत्व सांभाळणार्या त्या माऊलीला अन् तिच्या लेकराच्या हाती अन् ज्या आईचं मला परीक्षेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं मला मनोमन कौतुक वाटलं त्याच्या हाती एक एक चॉकलेट ठेवत एका वेगळ्या तडफेने मी वर्गात शिरली अन् पेपरमध्ये इतिहासात सगळीकडे पंडिता रमाबाई,रमाबाई रानडे,आनंदीबाई कर्वे,ताराबाई शिंदे पाहून ह्याच तर नव्हत्या ना बाहेर आपल्याला दृष्टांत देत असचं वाटून गेलं क्षणभर...
---जागा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर(आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघताना,😅
no prejudice while writing)
ता.क - भावना दुखवून घेऊ नये🙏
🖊📝 पुनम अहिरे📝🖊
Comments
Post a Comment