“गोष्ट एका Mentor ची”
खुप दिवसांपासून हा ब्लॅाग लिहायचा होता पण निकालासाठी राखुन ठेवला होता..आपल्या आयुष्यात काही लोकांच येणं हे खर्या अर्थाने दैवी वरदान आणि ते ही पूर्वनियोजित असल्यासारखं भासतं..आपल्या मिळमिळीत जगण्याला त्यांच असणं “मिडास टच” देऊन जात ..त्यांच्यासोबत आपल्याही जगण्याचं सोनं करु पाहणारी ही माणसं..”मिडास टच” अगदी चपखल वर्णन आहे ते कसे ते पुढे समजेलच…२०१९ च्या अंतिम यादीतून बाहेर पडल्यावर समोर प्रचंड अनिश्चितता होती ,कोविडमुळे पुणे सोडलेलं,घर लहान त्यात शुन्यापासून अभ्यास सुरु करायचा अशा परिस्थितीतही पुर्ण तयारीनिेशी स्वतःला एक शेवटची संधी द्यायची होती आणि जणू या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे हा की काय देवाने _लाइटहाऊस /वाटाड्या/Mentor_ म्हणून *पद्माकर सरांना* पाठवले….२०१९ च्या मुलाखतीच्या ग्रुपवरुन जुजबी ओळख होती ,त्यान्वये निकालानंतर अभिनंदन केलं अन् नंतर दोन-तीन माझे अभ्यासाचे काही प्रश्न विचारले सरांना तेव्हा सर म्हटले उद्या कॅाल करतो ,मी मनात विचार केला ,२०१९ च्या अॅडचे टॅाप टेनर आहेत सर त्यात डिसी ..कुठे वेळ मिळेल कॅाल करायला..पण बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी १.३०-२ ला स्टडी फ्लॅटमधून जेवायला निघणार तोच सरांचा फोन आला..९ जुलै २०२० चा तो दिवस होता..बास्स ..सरांच्या पहिल्याच कॅालची ४० मिनिटे माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडून गेली..नंतरही सरांच्या प्रत्येक कॅालने मनावरचं मळभ दूरच व्हायचं आणि यश हे आपल्या प्रयत्नांच बाय प्रोडक्ट कसं हेही उमजू लागलं…तयारीच्या काळातील पद्माकर सरांचा प्रत्येक कॅाल अन् प्रत्येक मेसेज नवसंजीवनी असायचा…काही वाक्य तर माझ्या अगदी जशाला तशी कानात बसली आहेत त्यावर पुढे लिहिते…कितीही भिती ,टेन्शन वाटलॅ तरी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून “तू चाल पुढं” म्हणायची कला फक्त सरांनाच जमो …कोविडच्या काळात परीक्षा पुढे जायची मग मी नाराज व्हायची , सर मला विचारायचे ,” हे वाचलं का? याच्या नोट्स बनल्या का?” यातून पुढे म्हणायचे अग Covid च्या disaster ला preparation strong करण्याची opportunity म्हणून बघ ना “.. सरांनी असं म्हटलं की मग काही फरक पडायचा नाही परीक्षा कधी होईल याचाही अन् कोणते सणवार आले काय नी गेले काय..आपल्याला सगळे दिवस सारखेच ..फक्त अन् फक्त अभ्यासाचे..एक खुप छान अनुभव सांगायचा आहे इथे ..कोविडची सेकंड वेव्ह असावी ..एप्रिल महिना होता ,सरांच्या आईचा वाढदिवस होता त्यादिवशी सगळे करता तसं फेसबुकच्या फोटोवरील कमेंटमधे मी विश केलं. अन् मी विसरुनही गेले नंतर आठ -दिवसांनी अभ्यासाचं बोलायचे म्हणून फोन केला अन् सर म्हटले “अग पुनम तू माझ्या आईला विश केलं त्याचा मला आनंद नाही झाला,मला वाटतं तुझ्यासारख्या मुलीने नको हे सोशलमिडीयावर वेळ घालवायला ,तू छान अभ्यास कर” ..सरांचे हे बोलणे ऐकून बंद केलेलं फेसबुक निकालानंतरच चालू झालं….२०२० ची राज्यसेवा पूर्व अभ्यासाच्या मानाने अवघड गेल्यावर टेन्शन आले ,सर म्हटले “ तू नाही झाली पास तर मग कोण होईल ?” हे एका वाक्यांच टॅानिक महिनाभर पुरायचं मला अभ्यासाला…आपले strong areas अजून strong करायचे म्हणत सरांनी मराठी इंग्रजीचे १५ निबंधाचे पेपर लिहून घेतले आणि कुठलीही बाजू वीक नको म्हणत GS 2 चा ६५ वरचा स्कोअर १०४ पर्यंत भिडला..हे सगळं होत असतााना सर फक्त ॲप्रोच सांगायचे ,विश्वास दाखवायचे आणि मग अभ्यासाचं ,accountability चं मीटर पुढे पळायचं…गुरुपौर्णिमेचा सरांना शुभेच्छा द्यायला मेसेज केला तेव्हा सर म्हटले “चांगला रॅंक हीच गुरुदक्षिणा”..काय मागावं या गुरुने तर शिष्याला मोठं होताना पाहणं..सरांच्या या वाक्याला त्या २०२१ च्या डायरीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून लिहिलं होतं…काल परवा एक मित्र सांगत होता,निकालाच्या दिवशी चॅनेलवर टाकलेलं -डायरीच पानं ज्यात होतं की मी हे DC चं स्वप्न जाहिरात आली त्या दिवशी पाहिलं होतं असं…परत याची प्रेरणाही सरांजवळ येऊन थांबते..सरांच वाक्य “२०१९ ची ॲड मला डिसी करायला आणि २०२१ ची तुला डिसी करायला” ..ही छोटी छोटी वाक्ये मनाला मरगळ येऊ देत नव्हती की थकू देत नव्हती..सर्वोत्तमाचा शोध घेऊ बघत होती ..यात aspirant म्हणून खुप सुधारत होतीच पण माणूस म्हणून ,पुढे जाऊन अधिकारी होऊन मला कोणाला आदर्श मानलं पाहिजे असे अनेक प्रश्न नकळत सुटतां होते…अभ्यासात थोडा जरी गॅप पडला तरी आठवायचं ,सरांना अपेक्षा काय आहे ,आपण काय करतोय मग लगेच गाडी रुळावर यायची..२०२० च्या मुख्य परीक्षेत खुप प्रयत्न करूनही चांगला स्कोर आला नव्हता ,खुप वाईट वाटले की सरांच्या मार्गदर्शनाला न्याय देऊ शकली नाही तेव्हा तर सरांचे बोलणे माझ्या आयुष्यभर लक्षात राहिल” पुनम , यश आपण कुठुन सुरु केलं तिेथूनही मोजायचं असतं ग,तू मेन्स स्कोअरमधे किती छान सुधारणा केली ते बघ ना ! स्वतःची पाठ थोपटून पुढे जाता आलं पाहिजे बघ,पुढची संधी तुझीच आहे “ मला हे ऐकून थक्कच वाटलं की माझा स्कोर अपेक्षेपेक्षा कमी आलेला असताना सरांनी ज्या optimistic view ने त्याकडे पाहायला शिकवलं त्याला खरचं हॅटस ॲाफ… जर तेव्हा सर नसते तर माझा मॅारल डाऊन झाला असता अन् कदाचित ड्रीमपोस्ट वाली मेन्स मी घालवून बसले असते ..२०२० च्या मेन्सचा माझ्यासाठी कमी असणारा स्कोर कोणतीतरी पोस्ट मिळेल यासाठी पुरेसा आहे हे लक्षात आल्यावर मी मुख्य २०२१ अन् २०२० ची मुलाखत याचा बॅलन्स साधावा यासाठी सरांनी सांगितलेलं एक वाक्य -“ तांब्याच्या मागे आपलं सोनं नको सुटायला असं बघशील” या वाक्याने मला मुलाखतीच्या दोन दिवस आधीपर्यंत आणि मुख्य २०२१ च्या आठवडाभरआधी लागलेल्या मेरीटलिस्टमधे पोस्ट पक्की झालेली असतानाही सत्कार टाळून अभ्यास करु दिला होता …२०२१ च्या मेन्स स्कोअर ऐकून सरांना झालेला आनंद अन् मला मिळालेलं समाधान शब्दात व्यक्त होऊ शकत नाही…२०२०च्या निकालातून पोस्ट पक्की करुन अन् २०२१ मधून क्लासवन पक्की करुन तब्बल दोन वर्ष फक्त कॅाल ,मेसेजवर संपर्कात असणार्या माझ्या आवडत्या मेंटॅारला एमपीसएससी अस्पारांयटच्या ड्रीमडेस्टिशन म्हणजेच पुणेच्या यशदाला भेटून हाती gratitude greeting दिले तेव्हाची आणि पोस्ट मिळाल्यावर एके दिवशी संध्याकाळी माझ्या दोन्ही मेंटॅार्सनी घरी दिलेली अनपेक्षित सरप्राईज व्हिझीट या फिलिंग्स इथे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही ..अभ्यासात ज्यांचा शब्द प्रमाण मानला त्या लोकांनी आपल्या स्टडी फ्लॅटला कधीतरी भेट द्यावी असे आम्ही अभ्यास करताना नेहमी म्हणायचो तेही स्वप्न पूर्ण झालं..पद्माकर सरांसोबत माझ्या कॅालेजला चीफगेस्ट म्हणून जाता आलं शिवाय सरांच भाषण ऐकता आलं अन् सरांसमोर भाषण देताही आलं..एक विद्यार्थी म्हणून तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीतला मोठा आनंद समजू शकतात…मी या सगळ्यांकडे फक्त परीक्षा पास होण्याची मेंटॅारिंग म्हणून बघत नव्हते .कोणताही गाजावाजा न करता सर असे कित्येक हिरे घडवत असतात..कुठलाही कंटाळा नाही की शॅार्टकट नाही,संधीचे सोनं कसं करायचं ,स्वसुधारणा नेहमी कशी करत राहायला पाहिजे, किती काय काय वाचावं,कशावर चिंतन,मनन करायचं ..hardcore aspirant होण्याच्या नादात lifetime कामात येतील असे अनेक insights मला सरांनी दिले…
2021 च्या निकालानंतर gratitude express करावा अशा लोकांपैकी तुम्ही एक नंबर आहात सर…
“*स्वप्न ते सत्य यांतील देवदूत
सर पद्माकर त्यांचे नाव “
“तुमच्या मार्गदर्शनामुळे नाही
भरकटली तयारीची नाव
तुमच्यामुळे घेऊ शकले
मी मोठ्या स्वप्नाची ठाव”
सगळं करूनही कधी
नाही आणला मोठेपणाचा आव”
आयुष्यात दोन-चारलोकांसाठी तुमच्यासारखं व्हायचं हाच मनी भाव”
Thank you so much my mentor Padmakar Gaikwad Sir (Deputy Collector ) for your valuable time , energy, insights and legacy .
तुमचीच विद्यार्थिनी
पुनम सुनंदा भिला अहिरे
परि कक्ष अधिकारी
लवकरच उपजिल्हाधिकारी
# Forever Grateful 🙏😍*
निरंजन सर सांगत होते , काही व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात अचानक येत असतील आणि तो तुमच्या आयुष्याचा turning point ठरत असेल तर तुम्ही नशीबवान आहात म्हणून नव्हे तर नियतीला ते कार्य सिद्धीस न्यायचंच आहे म्हणून !
ReplyDeleteअप्रतिम ब्लॉग !
हा ब्लॉग mpsc विश्वात mentorship चा नवा अध्याय सुरू करणार आहे !