तूजविण संसारी
#जागर स्त्रीशक्तीचा.
आनंदीगोपाळ चित्रपटाच्या खालील ओळी
तुझ्यावाचुनी शून्य
अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी
तुझी चेतना
तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना..!!
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता…!!
तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी
वांझ पुरुषार्थ व्हा..!!
प्रत्येक शब्दावर विचार करावा अशी ही रचना… महिलादिन ,नवरात्र आली की स्त्रीशक्तीचे गोडवे गायचे असं नाही पण या दिवसात जाणीवपूर्वक आजूबाजूच्या स्त्रीशक्तीला टिपावं…आपल्याच घरातली आई ,आजी ,ताई ,पत्नी ,मुलगी या सगळ्यांच एकाच वेळी किती आघाड्या सांभाळत असतात…जीव थकायला होतो असं बरंच काही सांभाळत असते ती ते ही न थकता ..जणूकाही तिला वरदानच लाभलं आहे अष्टभुजा होऊन संसार सावरायचं…जमेल तसं ना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नारीशक्तीशी निव्वळ बसुन गप्पा मारायच्या..मग ती शेतात राबणारी एखादी स्त्री , शाळेत शिकवणारी एखादी शिक्षिका,पतीच्या अकाली जाण्याने संसाराचा गाडी हाकलणारी कर्ती स्त्री ,जबाबदारीच्या ओझ्याखाली दबली गेलेली एखादी मोठी बहिण,करियर आणि संसार याचा बॅलन्स घालु बघणारी एखादी वर्किंग वुमेन, पॅावर कपलचा भाग असुनही स्वतःच्या लाइफ गोल्सचा प्रचंड मोठ्ठा कॅनव्हास असणार्या सुधा मुर्ती ,मंदाकिनी आमटे , लग्नाआधी प्रचंड करियरिस्टिक असणारी लग्नानंतर संसार ,नाती ,सणवार ,प्रथा परंपरा यामधून स्वतःसाठी वेळ काढतांना दमछाक करणारी ती ,पुढे मातृत्वाच्या फेजमधे कित्येकदा जेवायच्या ताटावरून उठून रडणार्या लहान लेकराला उराशी लावणारी ती,नव्या पिढीवर संस्काराचं शिंपण करणारी ती,जुन्या आणि नव्या पिढीत समन्वय करत कुटुंब टिकवणारी ती ,मोठी स्वप्नं दाखवत शिवबा घडवणारी एखादी जिजाऊ,एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाची पाठराखीण ,अपयशात सावणारी जवळची मैत्रीण,कामावरून दमून थकुन घरी आल्यावर हातातली बॅग घेत घरभर बागडणारी लेक …अशी किती रुप लिहू आणि किती नाही ..
“तुजविण संसारी “ खरचं उरेल का काही ?
तू आहेस ना ? असावी नेहमीच❤️💯
कुसुमाग्रज म्हणता तसं” समान मानव माना स्त्रीला ,तिची अस्मिता खुडू नका“
एवढं समजून घ्यावं सगळ्यांनी ..बाकी खुप करतेस सगळ्यांसाठी नऊ दिवस उपवास करता करता स्वतःशी संवाद कर आणि पाठ थोपटून स्वतःचीच…इथे मागे राहू नकोस …
~~ पुनवेच्या शब्दशलाका
#आयुष्याच्या डायरीतून
Guidance Bhetal ka?
ReplyDelete