ती,करियर आणि स्वप्नं


काल सकाळी सकाळी तिचा फोन आला..

आवाजावरून जरा वैतागलेली वाटतं होती.

जरा खोदुन विचारलं तेव्हा बोलु लागली,” अग बघ ह्या घरच्यांच ..परीक्षा अवघी ४० दिवसांवर आली आहे आणि ह्यांच आपलं हे स्थळ आलंय , हा मुलगा बघायला यायचं म्हणतोय ,आता तु सांग परीक्षा एवढी तोंडावर आलेली असताना  ही नवी आघाडी कशी झेलु तुच सांग?,कालच ह्यामुळे घरच्यांशी वाद घालुन लायब्ररीत बसलीय”तिचा त्रागा अगदी स्वाभाविक होता..तिचं म्हणणं ऐकुन घेतलं ,तिला थंड करत अभ्यासाची स्ट्रॅटेजी डिस्कस करत विषय दुर सारला. “करते ग चांगले रिव्हाइज “म्हणत तिने फोन ठेवला.. मन मात्र खुप प्रश्न विचारत होतं ,त्याला कारणही तसचं होतं कारण आदल्यादिवशीही अजुन एका जणीनं (अतिशय दुर्गम भागातुन पुढे येत उत्तुंग यश मिळवल्यानंतरचा तिचा स्वसंवाद) तिचं लिखाण शेअर केलं होतं ज्याचा आशय साधारणतः असाच काहीसा होता की तिच्या जन्मावेळीच समाजाने  तिला तिच्या रंग,रुपावरुन लग्नाच्या तराजुत तोललं होतं…हे दोन प्रसंग लागोपाठ झाल्यावर पुन्हा एकदा गर्ल्स अस्पारांयट जन्मा आठवलं..

का अजुनही असं होतयं की तिच्यसाठी लग्न प्रायोरिटी केली जाते तेही अगदी सुवर्णसंधी दारावर उभ्या असताना?

का आजही तिला रंग,रुप,उंची ह्यावरच जज केलं जात? का नाही तिच्यातली जिद्द,त्याग,स्वप्नपुर्ती तिचे अलंकार नाही बनत?

का नाही तिलाही दिली जात स्वप्नपुर्तीसाठी फुल्ल मुभा जशी मुलांना दिली जाते?

वर एवढे दिव्य पार पाडुन कमी कटॲाफमधे  होतं तुमचं काम ह्याची टोचणी असतेच नेहमी..

हे काही सरसकट चित्र नक्कीच नाही ,काही ठिकाणी अगदी सकारात्मक चित्रही दिसताय  

की पण ही बाजुही पुढे मांडली जावी यासाठी हे स्फुटलिखाण..

ह्याविषयावर लिहायला घेतलं की मन सैरभैर होत.. बोलायचं खुप असतं पण मांडायला मर्यादा येतात.जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात ती मागे नाही ,तिच्या पंखात प्रचंड ताकद आहे फक्त तशी संधी आणि साथ तिला मिळावी नेहमीच..

निबंधाच्या पेपरसाठी पाठ केलेल्या ओळी इथे सांगाव्या वाटतात.(थोडे शब्द बदलून) 

साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध

हक्क आहे स्वप्न पाहण्याचा

मातीमधला वतनवारसा

आकाशावर कोरण्याचा.

जन्म असो माळावरती

अथवा शाही उद्यानात,

प्रत्येक कळीला हक्क आहे

फूल म्हणून जगण्याचा आणि

स्वप्नपुर्तीसाठी धावण्याचा”

©️©️ पुनम

पुनवेच्या शब्दशलाका

Views may differ ,no prejudice while writing, just tried to show one side of coin.

Another side will be revealed soon😎

Comments

Popular posts from this blog

सावित्रीबाईंस पत्र

“गोष्ट एका Mentor ची”

जरा विसावू ह्या वळणावर-- ट्रेनिंग डायरी