पत्रास कारण की
प्रिय मिताली मॅम,
काय काय लिहू तुमच्याबद्दल …
तुम्हाला म्हटलं ना मी तुमचा हा खांद्यावरचा हात खुप आधार देतो हो..अंगात मूठभर मांस चढावं असं तुमचं प्रत्येक वाक्य असतं..
कुठून सुरु हा प्रश्न मला पडतं नाही कारण वनामतीच्या आपल्या पहिल्या भेटीच्यावेळच्याच चार गोष्टी टिपून घेतल्या होत्या डायरीत…अगदी तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या आणि समित्या बनवून अंमलबजावणीची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकून आम्हाला लीडरशीपचा पहिला पाठ पहिल्याच दिवशी शिकवला होता..वनामती आणि आमचं नातं बहरावं यासाठी तुमचे प्रयत्न आमच्या ॲाफिसचे आणि जनतेचं नातं सुधारवण्यासाठी आम्हाला नेहमी आठवतील….किती छोट्या गोष्टी लिहू…एका मेसेज कॅालवर उपलब्ध असणं असो की सर्व कर्मचार्यांना स्पेशल वाटेल असं बोलणं मग ते हाऊसकिपिॅग स्टाफला गिफ्ट द्यायचं सुचवणं असो की प्रत्येक वेळी लक्ष्मण काकांना बोलवणं असो…कौतुकाची थाप पाठीवर टाकण्यात तर तुम्ही कणभर सु्द्धा कमी पडत नाही ..मग ते गुढीपाडव्याला ,कल्चरला आमच्यासोबत सहभागी होणं असेल किंवा आज मॅगझिन उद्घाटनाला ते आमचे कष्ट म्हणत आमच्याहाती रिबीन देणं..कसं जमत हो तु्म्हाला…अन् ते लहान लेकरांना ट्रेनिंगला घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांना सगळ्यात स्पेशल फिल करुन दिलं तुम्ही ..अन् खरचं त्या ते डिझर्व्ह करतात हो..तुमचं एका-एकाचे नावं लक्षात ठेवण्याच्या कलेला तर मानलं राव..त्या माझ्या प्रश्नाच उत्तर देताना म्हटल्या “पुनम , असं काही करायचं ना की किमान चार मुलींना वाटलं पाहिजे की मला पुनम अहिरे सारखं व्हायचं आहे असं” जेव्हा तुम्ही हे बोलल्या ना तेव्हा मला आत वाटलं की मला मिताली सेठी सारखं व्हायचंय कृतीशील अधिकारी..आणि शिवाय तुम्हाला माझं नावं कसं बरं लक्षात राहिलं हा प्रश्न तसा अजूनही अनुत्तरितच आहे….आता वरचे पुढे कोणता एमपीससीची मुलाखत नाहीये नाहीतर प्रशासनातले आदर्श यात हमखास तुमचंच नाव घेतलं असेल आणि ठासून दाखलेही दिलं असतं…तुमचं ते मेळघाटातील काम…तो राणी बिटीयाचा व्हिडीओ ..सगळं कसं अगदी नावीन्यपूर्ण…अन् विशेष म्हणजे हे सगळं करतांना ओसंडून वाहणारा उत्साह..कसला त्रागा नाही की कटकट नाही ..कपाळावर आठ्या तर बिलकुल नाही ..problem solving Attifue नसानसांत भिनलाय तुमच्या..तुम्ही ज्या प्रकारे ट्विन्सचं मदरहुड चॅलेज एन्जॅाय करत आमच्या सगळ्य्ंची जबाबदारी लिलया पार पाडताय मा त्याला मनापासून हॅटस ॲाफ…त्या दिवशी तुम्ही म्हटंल्या ना “ आजूबाजू देखते रहो,observations लिखते रहो” त्यातून आणि आताच वाचलेल्याा पत्रास कारण की या पुस्तकातून हा लेखप्रपंच केलाय..बाकी तुमच्या हातून खुप सत्कार्य घडेल यात शंका नाही,उलट त्यात आमचाही सक्रिय सहभाग असो तरच तुमच्या शिकवणीला न्याय देता आला असं म्हणेल…
भविष्यात तुमच्यासोबत काम करायला खुप आवडेल ..
तूर्तास थांबते.
तुमचीच एक अधिकारिेणी
पुनम
पूनमताई तुमच्यात एक अधिकारी पेक्षाही मोठा व्यक्तीमत्व हा गुण आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट Positive घेता. म्हणून तुम्हाला सर्वच क्षेत्रात Positive Waves दिसतात हाच तुमच्या व्यक्तिमत्वातील खरा गुण आहे. त्यामुळे तुम्ही खूप पुढचा विचार करता.
ReplyDeleteतुझ्यातल माणूस असण खुप भावत दीदी... म्हणून केवळ आधिका नाही तर मला तुझ्यासारख इतकं सहज लिहता यावं...
ReplyDelete