Men's Day Special
अनघसाठी आजचा दिवस तसा खास होता ,त्याला आज लग्नासाठी मुलगी बघायला जायचं होतं ..घरात सकाळपासून आईची पळापळ चालली होती ,बहिणी वेगळ्या सूचना करत होत्या ,अनघ थोडा कन्फ्युझ्ड होता..एकीकडे आनंदही वाटत होता आणि एकीकडे दडपणही..शेवटी सगळ्यांची स्वारी मुलीच्या घरी गेली ..औपचारिकता झाल्यावर अनघला आणि मुलीला म्हणजेच अन्वीला दोघांना एकांतात बोलण्यासाठी घरच्यांनी वेळ दिला..दोन तीन मिनिटांची शांतता ब्रेक करुन अनघने बोलायला सुरुवात केली “तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे मला समजलं तर बरं होईल.?” हे ऐकताच अन्वयीने अपेक्षांची यादी पुढे केली ,”हे बघा आपल्या समाजात दरवेळी मुलींना गृहित धरलं जातं,दुय्यम स्थान दिलं जातं ,तसं तुम्ही समजू नये ,पितृसत्ताक समाज म्हणत दरवेळी तिच्या स्वप्नांची राखरांगोळी केली जाते तसंही काही तुम्ही करु नये ,बाकी एक मुलगी तिचं सगळं सोडून सासरी येते तेव्हा तुम्ही तिला समजून घेतलं पाहिजे वगैरे हे तर नॅार्मल आहे ते तुम्ही समजून घ्या” असं बरंच काही अन्वीने अनघने समोर मांडलं ..तो एका विचारचक्रात अडकून गेला ..काही दिवसात निर्णय कळवतो असं म्हणून अनघ आणि कुटुंबीय घरी गेले..अनघला खुप सारे प्रश्न पडले “पुरुष सत्ताक समाजाच्या दूषणाखाली आम्हाला कुणी समजूनच घेऊ शकत नाही का? सगळेच पुरुष “पितृसत्ताक संस्कृतीचा टेंभा मिरवणारे थोडे असतात ना ? पितृसत्ताक म्हणतं फक्त मुलींच्याच स्वप्नांची हेळसांड होते असं कुठे आहे ? कित्येकदा जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातो आम्हीपण ? वडलांच्या अकाली जाण्याने बालपणात प्रौढ होऊन जातो आम्ही त्याच काय ? कुणी घेतयं का लक्षात ?मुलींना जशी घरात रोजची काळजी असते काय स्वयंपाक करु तसं आम्हाला पण रोजचा प्रश्न असतो या महिन्याच्या पगारात काय काय करायचं ते ? बॅकेंचे हफ्ते भरुन भरुन आमचाही जीव जातोच की पण सगळे काय बघता किती राबते बिचारी स्त्री घरात एवढंच ? मुली म्हणता आम्ही सगळं सोडून येतो तुमच्यासाठी ,मान्य आहे पण आम्हालाही टेन्शन असतचं की नवी मुलगी आपल्या घरात कशी रुळेल? आई आणि बायकोला सांभाळण्यात माझं सॅंडवीच तर होणार नाही ना ? लहानपणापासून शिकवलं जातं ,छोट्या बहिण भावांची काळजी घ्यायची..मुलींना रडता तरी येतं छान आम्हाला मात्र रडण्यासाठीपण कोपरे शोधावे लागतात ..कधी माणसांमधे सापडतात ते आणि तर बाथरूममधे जाऊन रडून घेतो…तारुण्यात करियरसाठी धावावं लागतं..नोकरी असेल तर छोकरी मिळते ..नोकरी नसेल तर लगेच आमच्या कर्तृत्वावर ताशेरे ओढले जातात ..मातृत्वाच्या प्रसववेदना तू सहन करते हे मान्यच ,शेअर करु शकत नाही म्हणून तेही शेअर केलं असतं आम्ही , पण हॅास्पीटलच्या बाहेर रेस्टलेस होऊन येरझारा घालत असतो आम्हीपण , तुम्ही मुलांच पालनपोषण करता पण आम्हीपण त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पैशांची तजवीज करत असतोच ना ? पुरुषही चुकतो कधीकधी याचा अर्थ नाही ना की सगळेच पुरुष चुकता ..चुका जेंडरवर ठरत नाहीत ना …दरवेळी आम्हाला सांगितलं जात की तुमची काळजी घ्यायची ,तुम्हाला समजून घ्यायचं ,तुम्हाला स्पेशल फिल करुन द्यायचं ..आजच्या समानतेच्या काळात आम्हीपण ही अपेक्षा का ठेवू नये तुमच्याकडून ? एका कर्तृत्ववान पुरुषामागे एक कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो असं म्हणतात पण तसंच कित्येकवेळा आम्हीही तुमच्यामागे भक्कम उभे असतोच ना तेव्हा का आपण कमी पडतो असं म्हणायला की एका कर्तृत्ववान स्त्रीमागे पुरुषाचा हात आहे असं ? अनघच्या मनात प्रश्नांची सरबत्ती उसळत होती …तेवढ्यात आई शेजारी येऊन बसली ,त्याने आईकडे हे मांडलं ,आई म्हणाली “ हो रे खरंचं आहे हे सगळं ,Women empowerment च्या नादात men ला गृहित धरतोय की काय असं वाटून जातं कधी कधी ..दोघांचे वेगवेगळे रोल डिफाईन आहेत, छान सांभाळावेत ,गरजेनुसार थोडेफार चेंज होत राहतील ते,उगाच श्रेयवादाची लढाई करायला नको , एकमेकांप्रती आदर असावा एकमेकांना पुढे जाण्यात मदत करावी,उगाच म्हटलं जात का स्त्री आणि पुरुष हे दोन्ही संसाररथाचे दोन चाकं आहेत असं..”आईच्या कुशीत शिरत अनघला हायसं वाटलं..
To all the amazing men out there, may your day be filled with joy, recognition, and the appreciation you truly deserve. Happy International Men's Day❤️✨💫⭐️
P.S— खुप अवघडं गेलयं मुलांच्या बाजूने इमॅजिन करुन लिहायला ,करके देखो😅
-- आयुष्याचे धडे समाजमनाच्या डायरीतून ✅
#Respect 👏🙌✨
क्या बात... 👌
ReplyDeleteपुरुषा बद्दल खुप कमी लिहिलं आणि बोललं जात आणि अश्या गोष्टी बद्दल तर फारच कमी.