Posts

“गोष्ट एका Mentor ची”

   खुप दिवसांपासून हा ब्लॅाग लिहायचा होता पण निकालासाठी राखुन ठेवला होता.. आपल्या आयुष्यात काही लोकांच येणं हे खर्या अर्थाने दैवी वरदान आणि ते ही पूर्वनियोजित असल्यासारखं भासतं..आपल्या मिळमिळीत जगण्याला त्यांच असणं “मिडास टच” देऊन जात ..त्यांच्यासोबत आपल्याही जगण्याचं सोनं करु पाहणारी ही माणसं..”मिडास टच” अगदी चपखल वर्णन आहे ते कसे ते पुढे समजेलच… २०१९ च्या अंतिम यादीतून बाहेर पडल्यावर समोर प्रचंड अनिश्चितता होती ,कोविडमुळे पुणे सोडलेलं,घर लहान त्यात शुन्यापासून अभ्यास सुरु करायचा अशा परिस्थितीतही पुर्ण तयारीनिेशी स्वतःला एक शेवटची संधी द्यायची होती आणि जणू या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे हा की काय देवाने _लाइटहाऊस /वाटाड्या/Mentor_ म्हणून *पद्माकर सरांना* पाठवले…. २०१९ च्या मुलाखतीच्या ग्रुपवरुन जुजबी ओळख होती ,त्यान्वये निकालानंतर अभिनंदन केलं अन् नंतर दोन-तीन माझे अभ्यासाचे काही प्रश्न विचारले सरांना तेव्हा सर म्हटले उद्या कॅाल करतो ,मी मनात विचार केला ,२०१९ च्या अॅडचे टॅाप टेनर आहेत सर त्यात डिसी ..कुठे वेळ मिळेल कॅाल करायला..पण बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी १.३०-२ ला स्टडी फ्लॅटम...

जिल्हा संलग्नता पर्व

  बघता बघता जिल्हा संलग्नेतेचे दोन महिने संपले..वनामतीचे पुढील प्रशिक्षणासाठी बोलावणे आले आणि life on wheels च्या सेकंड इनिंगसाठी सज्ज होण्याची वेळ आली   होती पण ठरल्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांचा लेखाजोखा करायचा होता कारण ती एक आयुष्यभराची आठवण आणि शिकवण राहते आणि आयुष्याच्या डायरीतील एक एक पान “अर्थपूर्ण” करते…   काही महत्वाच्या अनिवार्य संलग्नता आटोपून आम्ही जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी रुजु झालो..कक्ष अधिकाऱ्यांची स्वारी भलतीच खुशीत होती कारण त्यांना स्वजिल्हा मिळाला होता..बाकी सहकारी दुसऱ्या जिल्ह्यात स्वतःची व्यवस्था लावत असताना आम्ही मात्र निवांत घरीच होतो …कलेक्टर ॲाफिसला रुजु होण्यासाठी गेलो असता पहिल्याच दिवशी रुजु अहवालात काय असायलाच पाहिजे (तारीख ,सही इ.बाबी)हे आमचे रुजु अहवाल बघत तेथील एका साहेबांनी आम्हाला समजावून सांगितले..मग पहिल्याच दिवशी पुढच्या दोन महिन्याचे वेळापत्रक बनवले अगदी अभ्यासाचं बनवतो ना तसंच.. कक्ष अधिकार्यांसाठीचे जिल्हा संलग्नता म्हणजे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामक...

Pain of Discipline Vs pain of Regret

Pain of discipline VS pain of regret असं लिहीलेलं एक पानं जुन्या नोट्स चाळताना हाती लागलं हे पानं.. कित्येक दिवस स्टडीटेबलवर विसावलेलं एक कामाचं पानं.. काही अनुभव शेअर करण्याचा मोह टाळता येतं नाही तसा हा.. तर २०१९ च्या अंतिम निकालापर्यंत म्हणजेच १९ जुन २०२० पर्यंत पण माझ्यासाठी हा फक्त फिलोसॅाफी देण्याचा quote होता पण… २०१९ च्या अंतिम निकालातुन थोडक्यात बाहेर पडल्यावर दर दिवशी हे फिल केले आहे.. कारण २०१९ च्या मुख्यला पुरेसा वेळ असताना योग्य मार्गदर्शनाअभावी ,स्वतःच्या काही गुन्ह्यामुळे(चुका नक्कीच नाही) जसं की एकाच वेळी ३-४ वेगवेगळ्या परीक्षा मनाप्रमाणे फोकस (?)केल्यामुळे स्वतः पोस्ट घालवली होती म्हणजेच काय शिस्त नव्हती अभ्यासात,विचारात आणि नियोजनात… मग आलं कोविड नावाचे वादळ.. जणू काही वरील quote मनात ठसविण्यासाठीच.. अंतिम निकाल लागला थोडक्यात निकाल गेला तेव्हाही जेवढे वाईट वाटलं नसेल तेवढे वाईट दरवेळी कोविडच्या कारणांमुळे परीक्षा पुढे गेली की वाटायची.. pain of regret हे तब्बल चारवेळा परीक्षा पुढे गेली तसं तसं जास्त सतावायचं.. मन मग मागचा हिशोब मागायचं की सांग मागच्या परीक्षेत pain of ...

ती,करियर आणि स्वप्नं

काल सकाळी सकाळी तिचा फोन आला.. आवाजावरून जरा वैतागलेली वाटतं होती. जरा खोदुन विचारलं तेव्हा बोलु लागली,” अग बघ ह्या घरच्यांच ..परीक्षा अवघी ४० दिवसांवर आली आहे आणि ह्यांच आपलं हे स्थळ आलंय , हा मुलगा बघायला यायचं म्हणतोय ,आता तु सांग परीक्षा एवढी तोंडावर आलेली असताना  ही नवी आघाडी कशी झेलु तुच सांग?,कालच ह्यामुळे घरच्यांशी वाद घालुन लायब्ररीत बसलीय”तिचा त्रागा अगदी स्वाभाविक होता..तिचं म्हणणं ऐकुन घेतलं ,तिला थंड करत अभ्यासाची स्ट्रॅटेजी डिस्कस करत विषय दुर सारला. “करते ग चांगले रिव्हाइज “म्हणत तिने फोन ठेवला.. मन मात्र खुप प्रश्न विचारत होतं ,त्याला कारणही तसचं होतं कारण आदल्यादिवशीही अजुन एका जणीनं (अतिशय दुर्गम भागातुन पुढे येत उत्तुंग यश मिळवल्यानंतरचा तिचा स्वसंवाद) तिचं लिखाण शेअर केलं होतं ज्याचा आशय साधारणतः असाच काहीसा होता की तिच्या जन्मावेळीच समाजाने  तिला तिच्या रंग,रुपावरुन लग्नाच्या तराजुत तोललं होतं…हे दोन प्रसंग लागोपाठ झाल्यावर पुन्हा एकदा गर्ल्स अस्पारांयट जन्मा आठवलं.. का अजुनही असं होतयं की तिच्यसाठी लग्न प्रायोरिटी केली जाते तेही अगदी सुवर्णसंधी दारावर...
  विषय तसा महत्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा.. तर वेळ तशी संध्याकाळची साडेसात-सातची.. ठिकाण— अर्थात प्रेमाचा चहा .. चहाची वेळ तशी टळलेली त्यामुळे वर्दळ कमीच,कानात हेडफोन टाकुन आवडीची प्लेलीस्ट ट्युन करत चहाचा कप मी हाती घेतला, स्पर्धा परीक्षा करणार्याला चहा ,गाणी याबाबत एक वेगळीच ओढ असते हे काही वेगळं सांगायला नको.कानातील गाण्याचा आवाज अचानक बंद झाला कारण कॅाल येत होता पाहिलं तर श्यामलीचा फोन होता तो,तिचं नाव पाहूनच मनात काहीतरी आलं आणि तेच तिच्या फोनचं प्रयोजन होतं हेही नंतर कळालंच.श्यामली तशी माझ्या मैत्रीणीची ,प्राजक्ताची अॅाफिसमधील सहकारी ,एक-दोन वेळा भेट झाल्याने तेवढी तोंड ओळख..फोन उचलत इकडतिकडच्या गप्पा झाल्या तशी ती मुदद्दयावर आली ,” अग थोडी हेल्प हवी होती ग जरा,श्याम आहे मेन्सला ,तुला तर माहीतच आहे दरवेळीच असतो तो मेन्सला पण मेन्सच्या पुढे काही जात नाही तो आणि त्यामुळे आमच्या लग्नाची गाडीही पुढे जात नाही आहे.श्यामलीच्या बोलण्यात एक आर्जव होता. ,”अग ,प्राजक्ता आणि मी सोबतच हे अॅाफिस जॅाईन केले ,चार वर्ष झाली जॅाइन होऊन,तिचं बघ चार वर्षात लग्न वगैरे होऊन सगळंच सेट झालय...

जरा विसावू ह्या वळणावर-- ट्रेनिंग डायरी

" _याच साठी केला होता अट्टाहास_"म्हणत फायनली तो दिवस उजाडला..प्रत्येक जण अनेक अडथळ्यांची मालिका पार करून ह्या वणामतीच्या उंबरठयावर मोठ्या मोठ्या बॅगा आणि मनात प्रचंड उत्साह घेऊन आला ._"वो घडी आ गई आ गई_"अस म्हणत जोधपूरी आणि पांढरया साडीमधे वनामतीमधे एकच जल्लोष सुरू झाला आणि रुजू अहवाल लिहिताच, डोक्यावर असलेली स्टेची टांगती तलवार बाजूला सारून सगळे फोटोसेशन मोड मधे गेले की अगदी आता वनामती मधून निघेपर्यंत तसांच आहे तो फोटोझोन.. ट्रेनिंगच्या पहिल्या पंधरवाड्यात सगळ्याच बाबतीत उत्साह अगदी खच्चून भरलेला होता मग तो फोटो साठी, लेक्चर मधे असो की बाहेर फिरून नागपूर explore करण असो.महाराष्ट्रतल्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या ह्या "क्रीम टॅलेंट" इतका मोठा वेळ सोबत राहणं, चहा नाश्ता,जेवणासाठी टेबलवर गप्पा मारणं, लेक्चर मधे memes चा पाऊस पाडून पुन्हा कॉलेज लाईफ जगणं म्हणजे " _एक वेगळच जग आणि वेगळीच दुनियादारी"._ .ट्रेनिंग च्या ह्या दोन महिन्यातील एक सुंदर पर्व म्हणजे "अमरावती प्रबोधिनी" .खर तर ह्या दोन महिन्यात जे काही शिकलो ते तिथेच शिकलो अस म्हणू शिक...

तशी "ती"

 स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात काही मुली अश्या दिसतात ज्यांच्यात खरचं ते टॅलेंट होते पण आज त्या समाज आणि संसारात अडकलेल्या दिसतात आणि त्यांच्यातील "अधिकारिणी"ला मी miss करते तेव्हा मला सुचलेल्या ओळी.... तशी ती होती हुशार शाळेत.. आता ती रमते तिच्या बाळात.. तशी ती जिद्दी होती माहेरी.. आता झाली ती सोशिक सासरी.. तशी ती होती जिज्ञासू अभ्यासू.. आता सासरचे म्हणता सून आमची कामसू.. तशी ती होती फिरणारी मैत्रीणीच्या ताफ्यात.. आता ती दिवसभर असते किचनच्या गराड्यात.. तशी ती होती स्वप्नाळू.. आता झालीय ती कष्टाळू.. तशी ती होती होती स्टेज गाजवणारी... आता ती झालीय नाती सांभाळत मन मारणारी.. तशी होती तिची स्वप्न मोठे ... समाजापुढे धैर्य पडले छोटे.. तशी ती होती जन्मजात अधिकारी.. आता ती आहे तिच्या घरची कामकरी.. तशी होती ती सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारी . आता झालीय ती तिला काय हवं हेच विसरणारी.. तशी ती आहे तुमच्या माझ्या घरात.. आज आहे ती आजी, आई अन ती मनात.. अशी ती दिसेल जेव्हा केव्हा... मन माझे खट्टू होते तेव्हा तेव्हा... तशी ती आजही आहे कुटुंबवादी  लेकीच्या स्वप्न स्वतःच जगणारी ती आशावादी -- पुनम ...